🌟परभणी जिल्ह्यातील साडेतीन लाखावर गोरगरिबांची दिवाळी आनंदात - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟'आनंदाचा शिधा' संच वाटपास सुरुवात🌟

परभणी : जिल्ह्यातील गोरगरीबांची दिवाळी आनंदाची साजरी व्हावी, यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला साडेतीन लाखावर आनंदाचा शिधा संचाचे वाटप सुरु करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात आनंदाचा शिधा संच देऊन वाटपास सुरुवात करण्यात आली. 

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे नायब तहसीलदार गणेश चव्हाण उपस्थित होते.या आनंदाचा शिधा संचामध्ये  खाद्यतेल व साखर प्रत्येकी एक किलो, चनाडाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो देण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्व पात्र अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजना कार्डधारक लाभार्थ्यांना प्रति कार्ड एक शिधा संच शंभर रुपयात मिळणार आहे. दिवाळीपूर्वी सर्व रास्त भाव दुकानदार यांच्यामार्फत लाभार्थ्यांना वाटप होतील, असे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या