🌟अपहृत बालिकेची माहिती देण्याचे जिंतूर पोलिसांचे आवाहन.....!


🌟आढळून आल्यास त्यांनी जिंतूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांनी केले 🌟 

परभणी : गावातील दोन तरुणांनी मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी जिंतूर पोलिसांकडे केली असून, त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  या गुन्ह्यातील अपहरण केलेली मुलगी ही 15 वर्षीय असून, तिला 26 जुलै 2020  रोजी रात्री 10 वाजता दरम्यान आरोपी नामदेव भिमा किरमडे आणि करण तुकाराम काळे या दोघांनी संगणमत करून फूस लावून पळवून नेले आहे.  या प्रकरणी तपास केला असता, अद्यापही अपहरण केलेल्या मुलीचा शोध लागला नाही.  त्यामुळे उंची -145सें.मी.,वर्ण-सावळा, केस काळे व लांब, पोशाख-पिवळ्या रंगाची साडी व ब्लाऊज, कपाळावर बारीक टिकली, पायात काळी चप्पल असून मराठी भाषा बोलते. अशा वर्णनाची मुलगी कोणालाही आढळून आल्यास त्यांनी जिंतूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले (9823210420) यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या