🌟याशिवाय वंचीत बहुजण आघाडीच्या युवा आघाडीच्या २ कार्यकर्त्यांना घोषणा देण्याच्या कारणावरून अटक🌟
परभणी (दि.०६ नोव्हेंबर) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १ नोव्हेंबर रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ही संघटना सभासद नोंदणी करीत असतांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (एबीव्हीपी)च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून एसएफआय व इतर समविचारी संघटनांनी ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी विद्यापीठात निषेध आंदोलन केले. त्याचा राग मनात धरून ABVP व भारतीय जनता युवा मोर्चा(भाजयुमो)च्या कार्यकर्त्यांनी ३ नोव्हेंबर रोजी नवसमाजवादी पर्याय पक्षाची संघटना न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशनच्या २ मुली व २ मुलांना ४००-५०० जणांच्या घोळक्याने घेरून मारहाण केली. याशिवाय वंचीत बहुजण आघाडीच्या युवा आघाडीच्या २ कार्यकर्त्यांना घोषणा देण्याच्या कारणावरून अटक करण्यात आली.
या सर्व घटनांचा निषेध म्हणून
आज परभणी जिल्ह्यातील सर्व डाव्या, आंबेडकरी व समविचारी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे निदर्शने करीत निषेध नोंदविण्यात आला व ABVP व भाजयुमोच्या संबंधित कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या संघटनांमध्ये प्रामुख्याने डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया(DYFI), ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन(AISF), लाल सेना आणि मानव मुक्ती मिशन इत्यादींचा समावेश होता.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन मा. गृहमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत पाठविण्यात आले. निवेदनावर डी वाय एफ आय च्या नसीर शेख, प्रबुद्ध काळे, अमोल पट्टेकर, AISF च्या संदीप सोळंके, गंगाधर यादव, सय्यद अझहर, लाल सेनेच्या कॉ. गोरे, अशोक उबाळे, विकी गोरे आणि मानव मुक्ती मिशनच्या रामप्रसाद अंभोरे आदींच्या सह्या आहेत. प्रतिलिपीत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा समावेश आहे.....
0 टिप्पण्या