🌟राज्यस्तरीय संविधान सन्मान पुरस्कारासाठी पुर्णा नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष तथा उत्तम भैया खंदारे यांची निवड....!


🌟लातूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार प्रदान🌟 

पुर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैया खंदारे यांना भारतीय संविधान जानिव जागृती कार्य संपूर्ण भारत भर करणाऱ्या सम्यक समाज लातूर चा 'राष्ट्रीय संविधान सन्मान विशेष पुरस्कार' जाहीर झाला असून दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी लातूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

तशा प्रकारचे पत्र सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत भारतीय संविधानाचा देश विदेशात  प्रचार आणि प्रसार करणारे सम्यक समाजचे प्रवक्ते प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे व निवड समितीने त्यांना पाठविले आहे.उत्तम खंदारे यांचा सामाजिक राजकीय शैक्षणिक आंबेडकरी व धम्म चळवळीतील योगदान सर्वश्रुत आहे.राजकारणाला विशुद्ध समाजकारणाची धम्म कार नाची जोड देऊन आंबेडकरी व धम्म चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

त्यांना मिळालेल्या बहुमोल पुरस्काराबद्दल 

अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महा थेरो भदंत पय्यावंश आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे समाजसेवक माजी नग सेवक देवराव जी खंदारे अनिल खर्गखराटे यादवराव भवरे अशोक धबाले दादाराव पंडित नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड एडवोकेट धम्मा जोंधळे मधुकर गायकवाड मुकुंद भोळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड उपाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सरचिटणीस तुकाराम ढगे त्र्यंबक कांबळे अतुल गवळी किशोर ढाकर गे मुंजाजी गायकवाड पत्रकार विजय बगाटे  सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड पी.जी. रणवीर मनोज खिल्लारे प्रवीण कनकुटे शाहीर गौतम कांबळे शिवाजी वेडे  शिवा हातागळे विशाल भुजबळ  आदींनी  केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या