🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.20 नोव्हेंबर रोजी होणार महिला लोकशाही दिन🌟  

परभणी (दि.16 नोव्हेंबर) : समस्याग्रस्त व पीडित महिलांनी सोमवार, दि. 20 नोव्हेंबर, 2023 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. 

सोमवार, दि.20 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहावे. समस्याग्रस्त व  पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा तसेच समाजातील त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तरी जिल्ह्यातील महिलांनी त्यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी विहीत नमुन्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात दाखल करण्यात याव्यात,  असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या