🌟वैद्यकिय सेवेला समर्पित पणे वाहून घेतलेल आदर्श व्यक्तिमत्व डॉ.विनय बगाटे....!

🌟पुर्णा तालुक्यातल्या भुमिपुत्राचा हिंगोली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात डंका🌟 


पुर्णा शहराचे भूमिपुत्र व हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.विनय विजय बगाटे यांचं सामाजिक शैक्षणिक धम्मविषयक व वैद्यकीय क्षेत्रातील योगदान सर्वश्रुत आहे.समाज सेवेचा व धम्मसेवेचा समृद्ध वारसा लाभलेले डॉ.विनय यांचे वडील पुर्णा शहरातील प्रथित यश पत्रकार विजय बगाटे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आई ज्येष्ठ धम्म उपासिका सुनीता ताई कुटुंब वस्तल सुस्वभावी या आदर्श संस्कारक्षम दाम्पत्याच्या संस्कारातून डॉ.विनय यांच्या जीवनाची जडण घडण झाली.

अस म्हटल्या जात "आई ही पहिली शिक्षिका असते" विजयराव बगाटे यांचा पिंड समाज सेवेचा पत्रकारितेचा पँथर चळवळीतून त्यांची जडण घडण झाली पूर्णायेथील कैलासवासी विठ्ठलराव मोरे मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक राहिलेल्या वेळेत दैनिक लोकमत चे तालुका प्रतिनिधी म्हणून तीन दशक पेक्षा जास्त त्या ठिकाणी काम केलं.आई वडिलांच्या सामाजिक धार्मिक कार्याचा न कळत प्रभाव सुपुत्र डॉ.विनय व सुकन्या डॉ. प्राची यांच्या वर पडला बालपणा पासुन कुशाग्र बुध्दी व खिलाडू स्वभावाचे डॉ.विनय होते त्यांनी पूर्णा येथील विद्या प्रसारणीसभेच्या शाळेतून 10 वी नेत्र दिपक यशाने उत्तीर्ण झाले.

नांदेड येथून 12 वी व मेडिकल सेट परीक्षा मेरिट श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एम बी बी एस परीक्षा प्रावीण्य श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.मुंबई विद्यापीठातून  ऑर्थोपे डीक डिग्री प्रविण्या मध्ये उत्तीर्ण केली. या दरम्यान त्यांना हिंगोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली.पुर्णा श ह रात त्यांचं बालपण गेले असल्या मुळे येथील सर्व समाज बांधव यांच्या  प्रती बांधिलकीची भावना होती.समाजातील गरीब कष्टकरी जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या साठी आपल्या समविचारी डॉक्टर मित्रांना सोबत घेऊन "जीवक सेवाभावी" हॉस्पिटल ची स्थापना केली. अखिल भारतीय भिक्कुंसंघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ .उपगुप्त महाथेरो पूज्य भदंत पय्यावांश व मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थिती मध्ये दवाखान्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. डॉ विनय व त्यांचे सहकारी डॉक्टर यांनी खूप चांगल्या प्रकारे दर्जेदार माफक दरा मध्ये सेवा दिली.व्यस्त वेळा पत्रका मुळे त्यांना हा दवाखाना पुढे चालवता आला नाही.

परंतु पूर्णा शहरांतील सेवाभावी प्रथितयश डॉ.संदीप जोंधळे यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये व्हिजीटिंग तज्ञ डॉक्टर म्हणून ते नियमित येत असतात.त्यांचा विवाह डॉ.प्रतिभा यांच्या सोबत झाला.त्यांनी एम. बी. बी. एस. करून सौंदर्य शास्त्रामध्ये एमडी केली आहे हिंगोली या ठिकाणी दोघांनी आपल सुसज्ज हॉस्पिटल टाकलेल आहे.आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सर्वांसोबत डॉ विनय यांनी ऋणानुबंध जपले आहेत.बऱ्याचशा आपल्या सुशिक्षित बेरोजगार मित्रांना रोजगार टाकून देण्यामध्ये ते अर्थपूर्ण योगदान देत असतात.वेळोवेळी मित्रांच समुपदेशन करण्याचं मोलाचं काम ते करत असतात.13 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन या मंगल प्रसंगी त्यांना व समस्त कुटुंबीयांना आयु आरोग्य बल व वैभव प्राप्त होवो ही मनोकामना...!

शुभेच्छुक

श्रीकांत हिवाळे सर

तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जी.परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या