🌟मैत्रीला जागणारा सहकारी मित्र हरपला - पत्रकार पंढरीनाथ बोकारे


🌟प्रत्येक समाजात त्यांचा चाहतावर्ग होता तसेच प्रत्येक राजकीय पक्षात त्यांचे समर्थक व चाहते होते🌟

नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तथा कामठा नगरीचे पुर्व सरपंच तसेच विद्यमान उपसरपंच स्व.सरदार रणजितसिंघ कामठेकर यांचे काल सोमवार दि.१३ नोव्हेंबर २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले शिख समाजातील तरुणांसह प्रत्येक समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायक व्यक्तित्व असलेले सरदार रंणजितसिंघ कामठेकर यांच्या निधनाने समाजातच नव्हे तर मित्र परिवार तसेच चाहत्या वर्गात देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे प्रत्येक धार्मिक/सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्व स्विकारण्याची त्यांची जिद्द निश्चितच उल्लेखणीय होती.प्रत्येक समाजात त्यांचा चाहतावर्ग होता तसेच प्रत्येक राजकीय पक्षात त्यांचे समर्थक व चाहते होते.

 शेती,समाजकारण,राजकारण, शिक्षण यात ते सदैव सक्रिय असत कामठा गावातील ग्रामपंचाय व नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या कमात त्यांनी उल्लेखनीय कारकीर्द बजावली त्यांच्या अकाली निधनाने अनेकांच्या मनाला चटका लावला त्यांना श्रद्धांजली वाहताना जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहणारा निर्मळ मनाचा नेता तसेच मित्रांच्या मैत्रीला जागणारा एक मित्र हरवला असून सरदार रंणजितसिंघ कामठेकर यांच्या अकाली निधनाचे दुःख मित्र परिवार व चाहते कधीच विसरणार नाही असेही पत्रकार पंढरीनाथ बोकारे म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या