🌟उपोषणाला बौध्द बांधवांचा पाठिंबा गौरचे सरपंच चंद्रकांत सावळे,गणपतराव दुथडे देखील बसले उपोषणाला🌟
पुर्णा : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे लढवय्या क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील मागील सहा दिवसापासुन अन्नाचा कणही न घेता बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ पुर्णा तालुक्यातील गौर येथील आमरण उपोषणास मागील चार दिवसापासून मुंजाजी नागोराव जोगदंड बसले आहेत . आज गुरुवार (ता ०१ ) त्यांची प्रकृती खालावली आहे . आरोग्य आधिकारी डॉ.एन एस देशमुख यांनी तपासणी करून उपचार केला आहे.
आज गौर येथील महीला पुरूष एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन पूर्ण गाव करत आहे . आमरण उपोषणकर्ते मुंजाजी जोगदंड सोबत साखळी आमरण उपोषणाला बौध्द बांधवांचा पाठिंबा गौरचे सरपंच चंद्रकांत सावळे ,गणपत सहादूजी दुथडे व सुमन गणपत दुथडे बसले आहेत . यांच्यासह सौ . रेखाबाइ मनोहर जोगदंड , चंद्रकला माधव जोगदंड , भागेरथीबाइ देवराव जोगदंड , रुख्मिणीबाइ , गंगाधर गंगाधर जोगदंड यांच्यासह पंधरा ते २० महीला-पुरुष २४ तास आमरण उपोषणाला बसले आहेत......
0 टिप्पण्या