🌟जायकवाडी जलाशयातून 8.5 टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती.....!


🌟परभणीत भगिरथ पाणी परिषदेच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी🌟

परभणी (दि.21 नोव्हेंबर) : जायकवाडी जलाशयातून 8.5 टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळविण्यासंदर्भात नगर व नाशिक जिल्ह्यातील काही साखर कारखानदार पुढार्‍यांनी केलेल्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयानेही मोठी चपराक दिल्याने येथील भगिरथ पाणी परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

            भगिरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित जोशी धानोरकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विलास बाबर, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश देशपांडे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, इंजि. शंकर आजेगावकर, अब्दुल हाई, उपेंद्र दुधगावकर शशिकांत आमिलकंठवार, आबा सामाले, संतोष चंदुलवार, राजाभाऊ शिरडकर, आदींची उपस्थिती होती.

           दरम्यान, भगिरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित जोशी धानोरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. 2014, 2015, 2018 आणि आता 2023 या वर्षातसुध्दा गोदावर पाटबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाविरुध्द नाशिक व नगरच्या मंडळींनी सातत्याने उच्च न्यायालयात आव्हाने दिली. त्याद्वारे या निर्णयात विलंब करण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्याय देवतेनेसुध्दा वारंवार याचिका फेटाळून, प्रसंगी कठोर आदेश देवून मराठवाडा वासीयांच्या हक्काचे पाणी सोडण्या संदर्भातला मार्ग मोकळा केला, अशी प्रतिक्रिया धानोरकर यांनी दिलासाशी बोलतांना व्यक्त केली. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्यात आला विलंब केला जावू नये, अशीही अपेक्षा व्यक्त केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या