🌟डॉ.चंद्रकांत लेनगुरे ह्यांची 31 व्या झाडीबोली साहित्य समेलंनासाठी निवड.....!


🌟केंद्रीय निवड समितीने डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांची एकमताने केलेली निवड ही गडचिरोली जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणवाह बाब🌟

              16  व 17 डिसेंबर ला गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी (खडकी )येथे होऊ घातलेल्या 31 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान नुकताच गडचिरोली जिल्ह्याला मिळालेला आहे.

              केंद्रीय निवड समितीने डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांची एकमताने केलेली निवड ही गडचिरोली जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणवाह बाब आहे.याअगोदर झाडीपट्टीचे नाटककार आदरणीय चुडाराम बल्लरपुरे सरांना हा मान मिळाला होता.

ह्या निवडीमुळे गडचिरोली व चंद्रपूर झाडीबोली साहित्यिक वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे. अनेक समाजिक, साहित्यिक सन्घटनानी त्यांचं अभिनंदन केलं आहे.डॉ. लेनगुरे सर हे वैद्यकीय क्षेत्रासी संबंधित असून त्यांचा पिंड हा साहित्यिकाचा आहे. ते गडचिरोली येथे झाडीबोली साहित्य मंडळाची 15 वर्षांपासूनची धुरा सांभाळत  आहेत. त्यांनी सुरुवातीला झाडीबोलीच बी पेरलं. आता त्याचं विशाल वृक्षात रूपांतर झालं असून त्यांच्या छायेखाली अनेक कविंची फळी निर्माण झाली आहे.

                 डॉ. लेनगुरे सर हे जेष्ठ कवी, लेखक, समीक्षक असून त्यांनी अनेक काव्यप्रकार आतापर्यन्त हाताळले आहेत.चारोळी, अभंग, मुक्तछंद, एकांकिका,नाटिका,समीक्षन, पुस्तकपरीक्षण  केलेली आहेत.असून त्यांचं बरंचस लिखाण झाडीबोलीत आहे. ते उत्तम गजलकार आहेत. त्यांनी आतापर्यन्त 7 पुस्तके लिहली आहेत. त्याचा "झाडीचा गोंदा" हा झाडीबोलीत काव्यसंग्रह आहे. त्यांनी अनेक कविंच्या पुस्तकाना  प्रस्तावना लिहल्या आहेत.शिवाय ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून साई सेवा समितीतर्फे जिल्ह्यातील अनेक गावात जाऊन आरोग्य शिबीर घेत असतात. तसेच रुग्णांवर मोफत उपचार करीत असतात. त्यांच्या कामाची अनेकांनी वाहवा केली आहे. त्यांनी साहित्य मंडळाच्या मार्फतीने जिल्ह्यात विविध उपक्रम, स्पर्धा,कविसमेलन, गजल कार्यशाळा, नवोदित कविंचे संमेलने घेतली आहेत.

                झाडीबोली केंद्रीय समितीचे सदस्य  ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर, झाडीबोली साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. किलनाके, सदस्य कवी पुरुषोतम ठाकरे, कवी उपेंद्र रोहणकर,प्रतीक्षा कोडापे ह्यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी जेष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बोढेकर सर, व रजनीताई बोढेकर ह्यांनी डॉ. चंद्रकांत लेनगुरे सरांचा सपत्नीक सत्कार केला.

                   लेखन - कवी, उपेंद्र रोहनकर,गडचिरोली.

                     .        मो. क्र.9403252944.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या