🌟निवडून आलेल्या सरपंच/सदस्य यांची जात वैधता संबंधी 22 नोव्हेंबरला सुनावणी...!


🌟सुनावणीस अर्जदार गैरहजर राहिल्यास अर्जदाराचे काहीही म्हणने नाही असे गृहीत धरुन गुणवत्तेच्या अधारावर निर्णय🌟

परभणी (दि.16 नोव्हेंबर) : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी परभणी या कार्यालयामध्ये निवडूक संबंधीचे प्राप्त प्रस्तावांपैकी जे अर्जदार निवडणूकीमध्ये सरपंच किंवा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत, परंतु त्रुटी अभावी त्यांचा जात वैधता प्रस्ताव या कार्यालयामध्ये प्रलंबित आहे. अशा अर्जदारांची दिनांक 22 नोव्हेंबर, 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. 

त्याअनुषंगाने निवडूक संबधीचे प्राप्त प्रस्तावांपैकी जे अर्जदार निवडणूकीमध्ये सरपंच किंवा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत, परंतु त्रुटी अभावी त्यांचा जात वैधता प्रस्ताव या कार्यालयामध्ये प्रलंबित आहे. अशा सर्व अर्जदारांनी त्यांच्याकडे असलेले मानीव दिनांकापूर्वीचे सर्व शालेय व महसुली पुरावे सोबत घेऊन दिनांक 22 नोव्हेंबर, 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक 03, जायकवाडी वसाहत परभणी, ता. जि. परभणी. येथे सुनावणीसाठी उपस्थित रहावे. सुनावणीस अर्जदार गैरहजर राहिल्यास अर्जदाराचे काहीही म्हणने नाही, असे गृहीत धरुन गुणवत्तेच्या अधारावर निर्णय देण्यात यईल, याची नोंद सर्व संबंधीतांनी घ्यावी असे अवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती परभणी यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या