🌟परभणीत आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाऊंडेशनच्या वतीने 19 नोव्हेंबर रोजी बुध्दरुप मुर्ती वाटप सोहळा...!


🌟शहरातील जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर 50 बुध्दरुप मूर्ती वितरण व धम्मदेसना समारंभ🌟

परभणी (दि.13 नोव्हेंबर) - आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाऊंडेशनच्या वतीने 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11. 30 वाजता जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर 50 बुध्दरुप मूर्ती वितरण व धम्मदेसना समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली.

             या वेळी प्रमुख धम्मदेसना म्हणून थायलंड येथील भदंत सिलाखुनसमोथन, फ्रक्रू विजतविरयानाना, फ्रमाहा नोपार्ट रत्नव्हरो,  फ्रमाहा हस्साचाई  प्रभजयो, फ्रपलाद  चय्यापॉर्न, थायलंड, अखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त  महाथेरो, थायलंड येथील सिने अभिनेता गगन मलिक यांची उपस्थिती राहणार असून विशेष अतिथी  म्हणून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी खासदार गणेशराव दूधगावकर, माजी आमदार विजय भांबळे, रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव, मुकेश बोराडे, कॉ. भाई किर्तिकुमार बुरांडे, पुणे येथील पोलिस निरीक्षक प्रविण मोरे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

              थायलंड येथील सिने अभिनेते  गगन मलिक यांनी देशात 84 हजार बुद्धांच्या मूर्ती  वाटप अभियानाचा संकल्प केला असून या अंतर्गत परभणीत 50 बुद्धरूप  मूर्तीचे वितरण करण्यात येणार आहे. या समारंभास बौद्ध धम्म उपासक-उपासिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाऊंडेशन, आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, संयोजन समितीचे  भिमराव शिंगाडे, डॉ. भगवान धूतमल, प्रा. डॉ. भिमराव खाडे,  भगवान जगताप, प्रा. डॉ. संजय जाधव, डॉ. प्रकाश डाके,  सुधीर कांबळे, राजेश रणखांबे, प्रा. डॉ. सुनिल तुरुकमाने, मंचक खंदारे, अमोल धाडवे, उत्तम गायकवाड, चंद्रशेखर साळवे, प्रदीप जोंधळे, शशिकांत हत्तीअंबिरे, भूषण कसबे, अंबादास तूपसमुंद्रे मकरंद बाणेगावकर आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या