🌟दिपावली निमित्त शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने 151 गरीब गरजूंना कपडे व मिठाईचे वाटप....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व जिल्हा पोलीस अधीक्षका रागसुधा आर.यांच्या हस्ते करण्यात आले वाटप🌟  


                        
परभणी (दि.१० नोव्हेंबर) - येथील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने 151 गरजू व गरीब व्यक्तींना साड्या ,कपडे व मिठाईचे वाटप परभणीचे जिल्हाधिकारी मा.रघुनाथ गावडे व जिल्हा पोलीस अधीक्षका श्रीमती रागसुधा आर.यांच्या हस्ते करण्यात आले.


                            
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीदूत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड. अशोक सोनी, डॉ. दिनेश भुतडा, प्राचार्य बाळासाहेब जाधव, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेश धूत, सौ वर्षा सारडा आदी उपस्थित होते. शांतिदूत सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त गेल्या वीस वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येतो. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले .दीपावली सारख्या सणाच्या निमित्ताने शांतिदूत सेवाभावी संस्था  गरजू साठी धावून येऊन त्यांना कपडे व मिठाईचे वाटप करून गोरगरिबांच्या घरी देखील दिवाळी साजरी व्हावी यासाठी प्रयत्न करतात हा उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे असे  ते यावेळी म्हणाले जिल्हा पोलीस अधीक्षक राग सुधा आर यांनी देखील शांतिदूत वर्षभरात अनेक उपक्रम राबवते त्याचे कौतुक केले शांतिदूत कपडे वाटप, ब्लँकेट वाटप, पाणी वाटप असे गरिबांसाठी सामाजिक उपक्रम घेते म्हणून मला  त्यांच्या  कार्यक्रमास उपस्थित  राहण्यास आवडते असे  त्या यावेळी म्हणाल्या यावेळी 151 गरजू महिलांना साड्या, पुरुषांना शर्ट पॅन्ट आणि मिठाईचे वाटप प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी माधव सारडा, सेजल सारडा, गौरव बाहेती, अण्णा कांची आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या