🌟गावातील नागरिकांचा स्वच्छता मोहिमेला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद🌟
पुर्णा (०१ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे आज रविवार दि.01 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 मध्ये गावात विविध ठिकाणी साफ सफाई करण्यात आली. गावातील स्वच्छता ही लोकांच्या सहभागातूनच होतं असते म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियान रबावण्यात येत आहे, याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सर्वच गावात स्वच्छता मोहीम राबवली जातं आहे.आज गावात नागरिकांचा स्वच्छता मोहिमेला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद होता. पूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले.
रस्त्यावरचा कचरा बाजूला टाकण्यात आला. गवत काढण्यात आले अशी विविध ठिकाणची स्वच्छता केली या मोहिमेत सर्व ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, उपसरपंच, गावातील नागरिक,तरुण कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, युवक मंडळ गणपती मंडळाचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी,जि. प. शाळा शिक्षक,रोजगार सेवक, जलसूरक्षक,ऑपरेटर CRP, बचत गट, महिला, अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनीस,आशा सेविका वैद्यकीय सहभागी झाले होते.आपले गाव,आपला तालुका,आपला जिल्हा, महाराष्ट्र आणि देश आपल्याला स्वच्छ करायचा आहे.
0 टिप्पण्या