🌟मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन 50 टक्के च्या आत ओबीसीत समावेश करण्याची मागणी🌟
पुर्णा : संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाचा जाहीर पाठिंबा देत व अंतरवली सराटी येथील आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन 50 टक्के च्या आत ओबीसीत समावेश करावा व कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता व मराठा आरक्षण मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव राजकीय नेते पुढारी कार्यकर्ते यांना गाव बंदी करण्यात आलेली आहे याकरिता सदरील साखळी उपोषण कान्हेगाव येथील मराठा समाजाने आज सुरुवात केलेले आहे जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांना समर्थनात हे साखळी उपोषण करण्यात येणार आहे अशी भूमिका सकाळ मराठा समाज कान्हेगाव येथील नागरिकांनी घेतलेली आहे......
0 टिप्पण्या