🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून अमृत कलश रथाला हिरवा झेंडा....!


 🌟देशभरात शूरवीर देशभक्तांना नमन करण्यात येत असून ‘मिट्टी को नमन,विरों को वंदन’ या उपक्रमांतर्गत रथयात्रा🌟


 
परभणी (दि.06 ऑक्टोंबर) : भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात शूरवीर देशभक्तांना नमन करण्यात येत असून, ‘मिट्टी को नमन, विरों को वंदन’ या उपक्रमांमध्ये 'माती माती, माझा देश' या अभियानांतर्गंत आज जिल्ह्यातील परभणी महानगरपालिका, जिल्हा परिषद, आणि सर्व नगर परिषद, पंचायतींकडून अमृत कलश एकत्र आणण्यात आले होते. या अमृत कलश यात्रेला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखविला. 


महापालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, नगर पालिका प्रशासनाचे श्री. जगताप, नगर पालिका, पंचायतींचे मुख्याधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्यासह मनपा उपायुक्त जयवंत सोनवणे, शहर अभियंता वसीम पठाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्पना सावंत आदी उपस्थित होत्या ही केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत माझी माती, माझा देश उपक्रम सुरु केला आहे. त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज अमृत कलश यात्रा काढण्यात आली. गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी व मातृभूमीसाठी झटणारे व त्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्याय शूरवीरांचा सन्मान व्हावा यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे.

ही अमृत कलश यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयातून महानगरपालिकेच्या राजगोपालचारी उद्यानात पोहचली. त्यानंतर मान्यवर उपस्थितांनी शहीद स्मारकाला अभिवादन केले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सर्व नगर पालिका, पंचायती आणि परभणी महानगरपालिकेतील सर्व प्रभागातून जमा केलेली माती एका कलशात एकत्रित करण्यात आली. या मोहिमेतील अमृत कलश दिल्ली येथे पाठविण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. 

या अमृत कलश यात्रेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये जिल्ह्यात 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान गावा-गावांमध्ये माती गोळा करून ‘अमृत कलश’ तयार करण्यात आले. हे ‘अमृत कलश’ आता नेहरू युवा केंद्रामार्फत मुंबईला पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर 22 ते 27 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील सर्व तालुक्यातील कलश घेऊन युवक मुंबई येथे गोळा करण्यात येणार आहेत. यानंतर 28 ते 30 ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे युवक रवाना होतील. बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात वापरण्यात येणार आहेत. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेल्या रॅलीत जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते....... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या