🌟मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या क्रांतिकारी मराठा योध्दा जरांगे पाटीलांना ताडकळसकरांचा पाठींबा🌟
महाराष्ट्रा मध्ये सर्वांत चर्चेचा विषय असलेल्या क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला संपूर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक पाठिंबा मिळत असून मराठा आरक्षणाचे वादळ संपूर्ण राज्यात पेटलेले आहे निस्वार्थ व्यक्तीमत्व असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजच नव्हें तर सर्वच समाजातील स्वाभिमानी नागरिक त्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत राज्यात आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे अत्यंत शांततेत व लोकशाही मार्गाने अठरा मुक मोर्चे झालेले असून या मोर्चांची जागतिक इतिहासात नोंद झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यामुळे मात्र संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण होण्याची वेळ आलेली आहे.
क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या या मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती परंतु आज रविवार दि.२९ ऑक्टोबर २०२३ पासून या साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्यात आले आहे या आमरण उपोषणाला सर्व ताडकळस यांच्या वतीने तसेच ताडकळस ग्रामपंचायत ने बहुमताने सर्वच पक्षांच्या नेत्यांना गाव बंदीचा ठराव मंजूर करून पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे यावेळी आमरण उपोषण करते कैलास कदम, राहुल बालासाहेब सवंडकर, हनुमान कामाजीराव आंबोरे, कल्याण विनायकराव आंबोरे,बालासाहेब सुंदरराव आंबोरे,रामदास बालासाहेब आंबोरे,तसेच बहुसंख्येने ताडकळस येथील महिलाही उपस्थित होत्या.....
0 टिप्पण्या