🌟जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल लोकश्रेय मित्र मंडळाने केला प्रमोद अंभोरे यांचा सत्कार🌟
परभणी (दि.०४ ऑक्टोंबर) - परभणी शहरातील समाजहितासाठी सतत कार्यशील असणारी संघटना लोक श्रेय मित्र मंडळाच्या वतीने समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजहित न्यूज चे संस्थापक संपादक प्रमोद अंभोरे यांची दयावान सरकार या सामाजिक संघटनेच्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल दिनांक 3 सप्टेंबर रोजी दयावान सरकार जिल्हा कार्यालय, आय.टी.आय. कॉर्नर, जिंतूर रोड, परभणी येथे भव्य स्वागत करण्यात आला. या वेळी लोक श्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूज चे संपादक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सलीम इनामदार, पदाधिकारी अब्दुल जब्बार, रुग्ण हक्क संरक्षण समिती चे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज, दयावान सरकार परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सचिव जनसेवक रमेश घनघाव, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, समाजहित न्यूज चॅनल चे मुंबई प्रतिनिधी नुरुद्दिंन जाविद सिद्दिकी, विलासराव लोखंडे, सुनील पैठणे, परमेश्वर गायकवाड, तुकाराम लोखंडे, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते....
0 टिप्पण्या