🌟प्रत्येक ठेवीदाराला त्यांचे पैसे परत मिळतील - ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांचे ठेवीदारांना आवाहन🌟
ज्ञानराधा पतसंस्थेतील सर्व ग्राहकांना विनंती की,कुटे ग्रुप कंपनी च्या आयकर विभगाची तपासणी सुरू आहे पण कुटे ग्रुप व ज्ञानराधा या दोन्ही वेगळ्या संस्था आहेत. या तपासणी मुळे ज्ञानराधा च्या ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. ज्ञानराधा मधील प्रत्येकाचा पैसा हा सुरक्षित आहे. नोटाबंदी काळात ही आपण ग्राहकांना सहकार्य केल होत. ..आजवर जे तुम्ही प्रेम दिलं विश्वास सहकार्य ज्ञानराधा ला बिड करानी केलं तसच पुढे ही ठेवावं. ज्ञानराधाच्या स्थापने पासून गेल्या सतरा वर्षात आपण ग्राहकांना जी सेवा दिली.. आपल्या सर्वांचा पैसा सुरक्षित ठेवला.. विश्वास संपादन केला तोच विश्वास पुढे कायम राखला जाईल.
जालना,बिड,नगर,परभणी जिल्ह्यातील कोणत्याही शाखेतील ग्राहकांना त्रास होऊ देणार नाही.फक्त ग्राहकांनी नेहमी प्रमाणे आपले व्यवहार चालू ठेवावेत .मी बीडमध्येच आहे..आयकर विभागाच्या चौकशी नंतर मी बाहेर आल्यानंतर प्रत्येक शाखेत येऊन भेट देणार आहे.. बोलणार आहे. पुढची अनेक वर्ष आपणास सोबत काम करायचे आहे. आजवर जशी सेवा दिली तशीच सेवा पुढे द्यावी ही विनंती..या काळात कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या सर्व शाखेला सहकार्य करा असे आवाहन ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन सुरेश कुटे यांनी केला आहे......
0 टिप्पण्या