🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ.....!


🌟यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्यासह मान्यवर अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती🌟


परभणी : माजी प्रधानमंत्री  इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन तसेच माजी उपप्रधानमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, तहसीलदार सुरेश घोळवे, श्रीराम बेंडे यांच्यासह उपस्थित अधिकारी –कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या