🌟परभणी जिल्ह्यातील ५ हजार दिव्यांगानां आधार कार्डच नाहीत मग शासकीय योजना मिळणार तरी कश्या.....!


🌟अधारकार्ड नसलेल्या दिव्यांगासाठी विशेष मोहीम राबविण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी🌟

परभणी - परभणी जिल्ह्या मध्ये आधारकार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचीत राहणा-या दिव्यांगाची संख्या साधारण ५ ते ६ हजार आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने मागील चार महिण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये शंभर दिवसाची विशेष दिव्यांग तपासणी व शोध मोहिम घेण्यात आली होती या मोहिमे मध्ये शासकीय यंत्रणेने दाखविलेल्या निष्काळजीपणा मुळे १००% दिव्यांगाचा शोध घेऊन त्यांचे आधार कार्ड व युडीआयडी कार्ड बनविण्यास जिल्हा प्रशासन पुर्णत: अपयशी ठरले आहे याच मुळे शहरी आणि ग्रामीण भागात आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या दिव्यांगाची संख्या मोठी आहे.


परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये हात नसणारे, हाताची बोटे छोटी असणारे, हाताची बोटे वाकडी असणारे, मतीमंद व इतर कारणाने हाताचे ठस्से न उमटणाऱ्या दिव्यांगाना आधार कार्ड पासून वंचीत राहावे लागत आहे  बोटांचे ठसे उमटत नसतील तर डोळ्यांच्या बुभुळांच्या आधारे आधार कार्ड काढता येतात परंतु प्रशासन त्यांच्या पर्यंत न पोहचल्याने अनेक दिव्यांगांचे आधार कार्ड नाहीत अश्या सर्व दिव्यांग बंधु आणि भगिनी साठी जिल्ह्याभरात एक विशेष शोध मोहिम घेवून अश्या वंचित दिव्यांगाच्या प्रत्येक्ष घरी जावून त्यांचे आधारकार्ड काढण्यात यावे. या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा  ढालकरी यांनी स्विकारले.

या बाबत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेऊन आधारकार्ड पासून वंचित असणाऱ्या दिव्यांगासाठी विशेष मोहिम समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणी परभणी, शहर महानगरपालिका व जिल्हातील सर्व नगरपालिका अंतर्गत राबविण्या बाबत सुचना द्याव्यात जेणे करून फक्त आधारकार्ड नसल्यामुळे विविध शासकीय योजनापासून वंचीत असणाऱ्या दिव्यांगाना न्याय मिळेल असे ही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या