🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली ‘आपत्ती धोके निवारणा’ची प्रतिज्ञा....!🌟दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस ‘आपती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली🌟    

परभणी (दि.१३ ऑक्टोंबर) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त शपथ दिली.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, तहसीलदार सुरेश घोळवे,श्रीराम बेंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्यासह अधिकारी -कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्य आणि जिल्हास्तरावर दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस ‘आपती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे यावर्षीपासून हा दिवस ‘आपत्ती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. शासनाच्या आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवून आपत्तीपासून स्वत:ची, परिवाराची, समाजाची आणि सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करून आपत्तीचे धोके कमी करणा-या समुदायाधारित उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होण्याविषयी शपथ दिली. तसेच परिवार व समाजात आपत्तीबद्दल जनजागृती करून त्यासंबंधी पूर्वतयारी करण्याबाबत सदैव प्रयत्नशील राहून, राज्यातील, जिल्ह्यातील आपत्ती प्रवण भागात, जीवित, वित्त आणि पर्यावरणविषयक हानी होऊ देणार नाही याबाबत कटिबद्ध राहण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी शपथ दिली.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटिबद्ध होण्यासंदर्भात यंदा प्रतिज्ञा तयार केली असून, ही प्रतिज्ञा सर्व शासकीय कार्यालयात आयोजन करण्यात आले होते....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या