🌟सुहागण येथील छ.संभाजी विद्यालयात म.गांधी,लाल बहादूर शास्त्री संस्कार व सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षिस वितरण समारंभ...!


🌟या कार्यक्रमास परभणी येथील यशोदीप अकॅडमीचे संचालक प्रा.वांगकर,संदीप भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


पुर्णा (दि.०२ ऑक्टोंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील मौ.सुहागण येथील आदर्श शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी राजे विद्यालयात नुकतेच महात्मा गांधी व भारताचे भुतपुर्व पंतप्रधान स्व.लाल बहादूर शास्त्री संस्कार व सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते ज्यांच्या बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन उद्या मंगळवार दि.०३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता संपन्न होणार आहे.

या बक्षिस वितरण समारंभाच्या कार्यक्रमास परभणी येथील यशोदीप अकॅडमीचे संचालक प्रा.वांगकर,संदीप भोसले व पूर्णा येथील पत्रकार व संपादक दिनेश (रणजीत) चौधरी उपस्थित राहणार असून या समारंभात गावातील नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हिराजी भोसले सर उपाध्यक्ष श्री बळीरामजी भोसले सर सचिव श्री दिलीप माने सर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या