🌟परभणी जिल्ह्यातील आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनों तिमाही मनुष्यबळ विवरणपत्र ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करा..!


🌟असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे🌟

परभणी : जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी आस्थापना व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ तसेच कलम 5 (2) अन्वये सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तिमाही मनुष्यबळ विवरणपत्र (इआर-1) 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे. 

रिक्तपदे सक्तीने अधिसूचित/जाहीर करणे या केंद्र शासनाच्या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी कायदा-1959 व अधिनियम-1960 च्या कलम 5 (1) अन्वये प्रत्येक तिमाहीस हे विवरणपपत्र नियमितपणे  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने सप्टेंबर 2023 या तिमाहीची माहिती 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंतच सादर करता येणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी या कार्यालयाकडून युजर नेम व पासवर्डचा वापर करून www.mahaswayam.gov.in वर माहिती भरून विवरणपत्र सादर करावे अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी 02452-220074 अथवा ई-मेल parbhanirojgar@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित विभागाने केले आहे..... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या