🌟अहमदनगर येथे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला....!


🌟शाळेच्या आवारात तंबाखू,गुटखा,नशेचे पदार्थ विक्रीसाठी ठेऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते🌟

अहमदनगर : अहमदनगर येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ तथा प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवार दि.०७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२-१८ वाजेच्या सुमारास शाळेतून घरी आपले शिक्षक मित्र सुनिल कुलकर्णी यांच्या गाडीवर येताना अहमदनगर येथील रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण करीत जिवघेणा हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांनी शाळेच्या आवारात तंबाखू, गुटखा,नशेचे पदार्थ विक्रीसाठी ठेऊ नयेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते त्यामुळेच त्यांच्यावर गावगुंडांनी जिवघेणा हल्ला करण्यात आला असावा.

प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने केली.गाडी अडवून तिन जनांनी लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली डोक्याला ४ टाके पडले आहेत डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.ते रस्त्यावर पडले.त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला परंतु अद्यापही पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही सीसीटीव्ही पटेजचा फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना त्यांच्या पत्नी प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांनी समाज माध्यमांसमोर मांडली आहे.

प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांनी असे म्हटले आहे की सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे असेही त्यांनी म्हटले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या