🌟पुर्णा तालुक्यातील मौ.कान्हेगाव येथील 'युवा प्रतिष्ठान' वाट्सऍप ग्रुपवर सरसकट पत्रकारांची बदणामी....!


🌟आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाकडून आयोजित रस्त्याच्या भुमी पुजणाच्या बातमी वरुन घडला प्रकार🌟


गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या मौ.फुकटगा ते मिरखेल या राज्यमार्ग क्रमांक ४४६ या रस्त्याच्या भुमी पुजणाची एकतर्फी बातमीत नाव का लावले नाही म्हणून 'युवा प्रतिष्ठान' या वाट्सऍप ग्रुपवर सरसकट सर्वच पत्रकारांना अत्यंत खालच्या स्तरावरील भाषेचा वापर करीत विनाकारण बदणामी करण्याचा गंभीर प्रकार दि.११ ऑक्टोंबर २०२३ रोजी घडल्यामुळे या संबंधीत प्रकरणी संतप्त झालेल्या पत्रकारांनी दि.१४ ऑक्टोंबर रोजी पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.प्रदिप काकडे यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टेंच्या विशेष विकासनिधीतून पुर्णा तालुक्यातील मौ.फुकटगाव ते मिरखेल राज्यमार्ग क्रमांक ४४६ या रस्त्याच्या भुमी पुजणाचे आयोजन कान्हेगाव ग्रामपंचायत प्रशासन व आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाची बातमी जवळपास सर्वच प्रसारमाध्यमांनी अगदी कुठल्याही प्रकारच्या जाहिरातींची अपेक्षा न करता आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या लोकहितवादी कार्याची विशेष दखल घेऊन बातम्या प्रकाशित केल्या परंतु स्थानिक गटातटाच्या राजकारणातून निष्कारण पत्रकारांना लक्ष करीत अत्यंत खालच्या स्तराच्या भाषेचा वापर करीत पत्रकारांवर चिखलफेक करण्याचा गंभीर प्रकार या गावातील निवृत्ती भुजंगराव नवघरे या व्यक्तीने 'युवा प्रतिष्ठान'या वाट्सऍप ग्रुपवर केल्यामुळे पत्रकारांनी या व्यक्तीसह संबंधित ग्रुपच्या ग्रुप ऍडमिनवर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून या निवेदनावर सय्यद सलीम सुहागणकर,सशिल गायकवाड,अनिल आहीरे,किशोर सुर्यवंशी, गोविंद मोरे,नारायन सोनटक्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या