🌟गुजरातच्या समृध्द साहित्य मंचावर महाराष्ट्रातील समर्पित सामाजिकतेचा सन्मान...!


 🌟तर संपन्न प्रतिभेचा आत्मिक गौरव व धुंद कवितेचा हृद्य सत्कार🌟


                     
बलसाड ( गुजरात ) - दि.०१ - १० -२०२३ रोजी येथील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिराच्या विस्तीर्ण सभागृहात, केवळ एक ते दीड वर्षात साहित्य क्षितिजावर नामवंत ठरलेल्या व संतुलित वैचारिक अधिष्ठान असलेल्या भाग्यश्री बागड या तरूण कवयित्रीने संस्थापित केलेल्या - भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच, बलसाड - च्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय कविसंमेलनात साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित असलेले डॉ. डी. व्ही. खरात, चिखली यांचा त्यांना सामाजिक कार्यास्तव अमेरिकन विद्यापीठाकडून प्राप्त ऑनररी डॉक्टरेट निमित्त तथा डॉ. बबनराव महामुने, हिवरा आश्रम, बुलढाणा यांना साहित्यिक कथाकथनास्तव अमेरिकन विद्यापीठाकडून प्राप्त ऑनररी डॉक्टरेट निमित्ताने, संमेलन अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मान पत्र तथा स्मृती चिन्ह प्रदान करून उभयतांचा गौरव करण्यात आला. तर ज्येष्ठ कवी साहित्यिक तथा बहूजन साहित्य संघ, चिखलीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, चिखली यांच्या - त्या तरूच्या सावलीला


चल सखे बोलू जरा - या, देशाच्या विविध राज्यात सातत्याने गाजत असलेल्या गेय कवितेने ( मझल ने ) तिसऱ्यांदा गुजरातच्या साहित्य मंचावर अशी धमाल उडविली की संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा.चंद्रकांतदादा वानखेडे यांनी कविता संपताच  प्रेक्षक तथा संमेलनात सहभागी असलेल्या सर्व कवि रसिक मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या टाळ्यांच्या गजरात, स्वयंप्रेरणेने उठून समोर येऊन ॲड. कस्तुरे यांना शाल तथा पुष्पगुच्छ देऊन विशेष हृद्य सत्कार केला. मा. शरदजी चितोडकर यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या राष्ट्रीय कविसंमेलनात स्वागताध्यक्ष मा. सुनील तात्या नेरकर तथा प्रमुख व विशेष निमंत्रित साहित्यिक सर्वश्री मा. गुलाब राजा फुलमाळी, मा. साहित्यिक प्रकाश फर्डे, मा. साहित्यिक मनोज पाटकर तथा मा. साहित्यिक चंद्रकांत कोठावदे इत्यादीं सर्वांनी आपापल्या भाषणातून या " मझल " चा व तिच्या गेय सादरीकरणाचा विशेष उल्लेख केला. जातीधर्माच्या नावाखाली सारा देश होरपळून निघत असताना त्यावर तसेच बेकारी,खाजगीकरण,आरक्षण सारख्या ज्वलंत विषयावर प्रत्येक साहित्यिक व कवीने परखडपणे लिहिले पाहिजे, साहित्यिकाने मनात आणले तर देशाचे,राजसत्तेचे सर्व चित्र तो बदलू शकतो,असे म्हणून अध्यक्ष तथा सर्व विद्वत्जनांनी उपस्थित साहित्यिकांना अशा गंभीर बाबींवर लिहिण्याचे आवाहन केले. तसेच सांगोल्याचे अनिल केंगार, धाराशिवचे मधुकर हुजरे, रमेश उमरगे, मनमाडचे राजू लाहीरी, आनंदवनचे नीरज आत्राम,संगमनेरच्या आयुष्मती रंजना बोरा,मोहोळचे अशोक मोहीते, बुलढाणा जिल्ह्यातील हि.रा.गवई, राज ईंगळे, मनोहर पवार, डॉ.निवृत्ती जाधव, वर्षा ईंगळे यांनी आपल्या रचना सादर केल्या. मात्र डॉ.डी.व्ही.खरातसरांच्या, विहाराच्या वाटं.....या कवितेने जीवनातील शुचिर्भूतता दर्शवली तर डॉ.बबनराव महामुने यांच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतर सुध्दा गरीबांच्या घरातील लेकरांच्या हाती अजूनही भाकरी पडत नसल्याचे विदारक चित्र उभे केले. अंकुश पडघान यांच्या, काळी माती माय माझी,अंती पोटाशी धरते या कवितेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. अशा इतर विविध राज्यातून आलेल्या बऱ्याच प्रस्थापित तथा नवोदित गझलकार कविंनी आपापल्या रचना सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी बऱ्याच मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या