🌟राज्यातील शाळा/महाविद्यालयांना दि.०९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर....!


🌟राज्याच्या शिक्षण आयुक्तालयाने आज शुक्रवारी दिवाळी सुट्ट्यांबाबत केली घोषणा🌟 

परभणी : राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांच्यातील दिपावली सुट्ट्यांबाबत समानता यावी म्हणून राज्याच्या शिक्षण आयुक्तालयाने सन २०२३/२४ या शैक्षणिक वर्षातील दिपावली सुट्ट्यांबाबत नवा आदेश काढला असून त्याप्रमाणे दि.०९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२३ या दरमान्यच्या कालावधीत दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहे.

या शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुट्ट्या सहा नोव्हेंबर पासून जाहीर करण्यात आल्या होत्या, त्या २५ नोव्हेंबर पर्यंत असतील असे शिक्षण विभागाने म्हटले होते.२६ नोव्हेंबर रोजी रविवार,२७ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती निमित्य सुट्टी,त्यामुळे २८ नोव्हेंबर पासून शाळा सुरू होतील असे अपेक्षित होते.

 परंतु राज्याच्या शिक्षण आयुक्तालयाने शुक्रवारी दिवाळी सुट्ट्यांबाबत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात सुसूत्रता राहावी म्हणून ०९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर यादरम्यान दिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या