🌟हिंगोली शहरातील रामलीला मैदानावरील दसर्‍यातील ई-निविदा मिळविण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र जोडले.....!


🌟हिंगोलीच्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी दिले एसडीएमला चौकशीचे आदेश🌟


 
हिंगोली :- हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातील ऐतिहासीक दसरा महोत्सवाची जोरदार तय्यारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने मागविण्यात आलेल्या ई-निविदा सोबत चक्क बनावट प्रमाणपत्र जोडून प्रशासनाची दिशाभूल करीत ई-निविदा प्राप्त केल्याची खळबळजनक घटना घडली असून या गंभीर घटनेची तक्रार करण्यात आल्याने या तक्रारीची दखल घेत जिल्ह्याच अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी ०६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशीचे लेखी स्वरूपात निर्देश दिले आहेत.

हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर सार्वजिनक दसरा महोत्सवासाठी झोके व विविध मनोरंजानाची साधणे उभारण्याकरीता २८ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ई- निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये गुलशन टेन्ट हाऊस अ‍ॅण्ड लाईट मंडप डेकोरेशन परभणीचे शेख इफ्तेखार यांनी निविदा भरली होती. तसेच औंढा तालुक्यातील सावळी येथील बबनराव मारोतराव सावळे यांनी तसेच इतरांनीही निविदा भरली होती. दसरा महोत्सव समितीच्या अटी व सूचनेनुसार संबंधीत क्षेत्राशी निगडीत एक वर्षाचा अनुभव आवश्यक होता. त्यानुसार ई- निविदांसोबत अनुभव प्रमाणपत्रेही जोडण्यात आली होती. परंतु, यामध्ये व्यंकटाद्री सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या.वसई ता.औंढा यांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र जोडून ई- निविदा मिळविल्याची तक्रार औरंगाबाद  येथील शेख हबीब दादामिया व परभणी येथील शेख इफ्तेखार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. बनावट अनुभव प्रमाणपत्र गंगाबाई सरकटे मेडिकल कॉलेजने दिल्याचे हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात संबंधीत मेडिकल कॉलेज अस्तीत्वात आहे का? याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्या तक्रारींची दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी ०६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना चौकशीची निर्देश दिले असून, यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असेही पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, हिंगोली येथील दसरा महोत्सव हा ऐतिहासीक असून, देशातील दुसर्‍या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखल्या जातो. परंतु, ई- निविदांवरून दसरा सुरू होण्याअगोदरच तक्रारी पुढे येवू लागल्या  आहेत. आता बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या तक्रार प्रकरणात  उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी काय भूमीका घेतात याकडे हिंगोलीवासीयांचे लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या