🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक,कार्यकर्त्यांकडून आपली घरं जाळून घेतायत ही शंका ; जाळपोळ न करण्याचं मनोज जरांगेंचं आवाहन

* बीडमध्ये मराठा आंदोलन पेटलं,अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर आंदोलकांची दगडफेक ; सोळंकेंच्या बंगल्यामधून धुराचे लोळ

*  जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक, कार्यकर्त्यांकडून आपली घरं जाळून घेतायत ही शंका ; जाळपोळ न करण्याचं  मनोज जरांगेंचं आवाहन.

* मराठा आरक्षण आंदोलन भरकटतंय,हिंसक आंदोलन मागे कोण ? मनोज जरांगे पाटलांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार करावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* आमदारांच्या घरावर हल्ला हे सरकारचं अपयश, सुप्रिया सुळे

* मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक

* 11 हजार 530 जणांना उद्यापासून कुणबी दाखले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची घोषणा

* अर्धवट नको, अख्ख्या महाराष्ट्राला मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही -- मनोज जरांगे

* राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा झटका,दुसरं वेळापत्रकही फेटाळलं,आता 31 डिसेंबरची मुदत

* कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण देऊ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'शब्द'

* बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.मराठा आंदोलक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांना आग लावली

* आंध्रप्रदेश: विजयनगरममध्ये भीषण रेल्वे अपघात, दोन पॅसेंजर ट्रेनमध्ये धडक ; 12 हून अधिक जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

* पिंपरी चिंचवडमधील डी.वाय.पाटील कॉलेजच्या पार्किंग स्थळी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली मात्र अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले.

*भाजपला धक्का मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांचा राजीनामा

* '70 नाही 140 तास काम करा', नारायण मूर्तीच्या वक्तव्याला OLA च्या CEO चा पाठिंबा काही दिवसांपूर्वीच देशातील आघाडीची IT कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांनी 12-12 तास काम केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन गट पडले, एका गटाने या वक्तव्याचे समर्थन केले तर दुसऱ्या गटाने विरोध केला.

* 'वंदे साधरण' ट्रेनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. वंदे साधारण ही एक्सप्रेस चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे. या ट्रेनला 22 डबे आहेत आणि दोन्ही बाजूला लोकोमोटिव्ह इंजिन बसवण्यात आले आहेत. यात 12 स्लीपर क्लास कोच, 8 जनरल कोच आणि 2 गार्ड कोच आहेत.

* राज्यामध्ये मराठा आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवल्यानंतर सायंकाळी बीड येथील राष्ट्रवादी भवनाला आंदोलकांनी आग लावली.* यावर पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी जाळपोळ करु नका अशी विनंती केली आहे.

* मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 1 नोव्हेंबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होणार असून आणखी सहा टप्पे होतील असं ते म्हणाले आहेत. पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचा नाही. मराठा भरकटत नाहीये, आमचे आंदोलन शांततेत सुरु आहे, असे जरांगे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वाचाळ नेत्यांना आवरावे. आमच्या वाटेला गेलात तर मराठे सोडणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

*साताऱ्यातील मांढरदेवी मंदिरात राजकारण्यांना प्रवेश बंदी, मराठा आरक्षणासाठी असा निर्णय घेणारं पहिलंच मंदिर

* गॅस सिलेंडरपासून ते GST संदर्भातील नियम 1 नोव्हेंबर बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

* बँकेची कामे उरकून घ्या! नोव्हेंबर महिन्यामध्ये शनिवार रविवार धरून 15 दिवस बँका  राहणार बंद; रिझर्व्ह बँकेने केली सुट्टीची यादी जाहीर 

* बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटला; आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी भवनची जाळपोळ

* रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता पुणे रेल्वे स्थानकावर मिळणार पाच रुपयात लीटरभर पाणी

* जालना ते छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्ग  31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी बंद राहणार; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले जाहीर 

* परदेशी पाहुण्यांचे आगमन! गोंदिया जिल्ह्यातील धरण व तलावांवर स्थलांतरित; पक्ष्यांच्या 50 हून अधिक प्रजातींचा चार महिने असणार मुक्काम

* 2047 मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलरची होईल

* ZEEL प्रकरणात पुनित गोएंका यांना मोठा दिलासा, SAT ने SEBI च्या आदेशाला दिली स्थगिती             

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या