🌟प्रेम गुप्ता यांच्या सारखे निर्मळ हृदयी लोक देखील समाजात आहेत ही बाब निश्चितच उल्लेखणीय म्हणावी लागेल....!


🌟असा विचार प्रत्येक जन्मदात्याने केल्यास सासरच्या त्रासापासून प्रत्येक मुलीला मुक्तता मिळेल अन् आत्महत्या/हत्या देखील थांबतील🌟

मुलगी ही कधीच वडिलांसाठी ओझे नसते मुलगी आई-वडीलांचा अभिमान असतो रांची येथील रहिवासी असलेल्या प्रेम गुप्ता यांनी आपली मुलगी साक्षीला तिच्या सासरच्या घरातून बॅंड आणि फटाके वाजवत सन्मानाने घेऊन घरी आणले.असा विचार प्रत्येक जन्मदात्याने केल्यास सासरच्या त्रासापासून प्रत्येक मुलीला मुक्तता मिळेल अन् आत्महत्या/हत्या देखील थांबतील हुंडाबळीला जेवढं जवाबदार सासरची मंडळी असते तेवढेच जवाबदार आई-वडील देखील असतात कारणं मुलीच्या सुखासाठी सासरच्या मंडळींना खुष करण्याच्या निर्मळ भावनेतून आपण आपल्याच मुलीच्या दुःख आणि मानसिक शारीरिक छळाला कारणीभूत ठरत असल्याची जाणीव आई-वडीलांना तेव्हा होते जेव्हा सासरच्या मंडळींच्या अपेक्षां मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होत असते अन् सुरूवात होते मुलीच्या मानसिक/शारीरिक छळाला ?

रांची येथील प्रेम गुप्ता यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले की मुलगी असो की मुलगा आई-वडीलांसाठी समान असतात त्यांच्या सुखासाठी आलेल्या प्रत्येक प्रसंगाला अगदी मोठ्या मनाने सामोरे जावून त्यांना हिंमत द्यायला हवी प्रेम गुप्ता यांची मुलगी साक्षी हिचा सासरच्या मंडळींकडून सतत छळ केला जात होता अखेर प्रेम गुप्ता यांनी काही केल्या आपल्या मुलीचा छळ थांबत नसल्याने त्यांनी मुलगी असली तर काय ती आई-वडीलांवर ओझं नसतं हे आपल्या कृतीतून दाखवून दिले ज्या समाजात प्रत्येक आई-वडील स्विकारतात की लग्नानंतर मुलगी माहेरच्यांसाठी अनोळखी होते त्या समाजात मात्र प्रेम गुप्ता या वडिलांच्या वागणूकीने अभिमानाने मन भरून येते.

प्रेमजींनी अगदी बरोबर केले, लग्न पुन्हा होऊ शकते
पण आयुष्य एकदाच येतं, पुन्हा येत नाही सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करून जिवन संपवण्यापेक्षा किंवा सासरच्या मंडळींच्या अमानुषपणे झालेल्या छळातून मृत्यू होण्यापेक्षा मुलीने आईवडिलांच्या घरी राहणे चांगले.
ही विचारसरणी अंगीकारणारे प्रेम गुप्ता यांच्या सारखे निर्मळ हृदयी लोक देखील समाजात आहेत ही बाब निश्चितच उल्लेखणीय म्हणावी लागेल आपल्या मुलीचा आत्मसन्मान राखण्यासाठी अगदी वाजतगाजत तिला आपल्या घरी अर्थात माहेरी सन्मानाने आणण्यासाठी गेलेल्या प्रेम गुप्ताजी यांचे कर्तृत्व निश्चितच प्रशंसनीय प्रशंसनीय म्हणावे लागेल यावर तुमचे मत काय आहे ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या