🌟आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस🌟
पुर्णा तालुक्यातील गौर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसह मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दि.२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली असून आज मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
क्रांतीकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून व मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी गौर येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सातत्याने आंदोलन करण्यात येत असून महिला मंडळाच्या वतीने साखळी उपोषन तर उपोषण तर मुंजाजी नागोरावजी जोगदंड यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.....
0 टिप्पण्या