🌟माध्यम जगतात घडलेल्या उदगीर,नांदेड आणि सातारा येथील घटनांनी राज्याचे लक्ष वेधले🌟
मुंबई : माध्यम जगतात काल घडलेल्या चार घटनांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले उदगीर, नांदेड आणि सातारा येथील या घटना काय आहेत बघा..
*उदगीर*
उदगीर येथील उदगीर समाचारचे संपादक श्रीनिवास सोनी शहरातील शासकीय रूग्णालयात उपलब्ध औषध साठयाची माहिती घेण्यासाठी गेले असता औषध निर्माण अधिकारी राजकुमार मालशेटवार यांनी पत्रकार सोनी यांना जिवे मारण्याची धमकी दिली, अर्वाच्च शिविगाळ केली.. सोनी यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय .. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पत्रकारांनी केलीय..
*नांदेड*
चहा पेक्षा केटली गरम या वाक्प्रचाराचा प्रत्यय आपणास नेहमी येतो.. आज नांदेडमध्ये ही आला.. सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद होती.. हॉलमध्ये पत्रकारांपेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच जास्त होते. पत्रकारांनी त्यास आक्षेप घेतला.. कार्यकर्त्यांनी बाहेर जावे अशी विनंती पत्रकारांनी केली.. त्यावर जिल्हाध्यक्षांचे पती सुभाष रावणगावकर भडकले.. त्यांनी आम्हाला बाहेर जायला सांगणारे तुम्ही कोण? असं म्हणत पत्रकाराशी हुज्जत घातली.. मग पत्रकारही भडकले.. रावणगावकर यांनी माफी मागितल्याशिवाय पत्रकार परिषद होणार नाही असा पवित्रा पत्रकारांनी घेतला.. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी रावणगावकर यांना पत्रकारांची माफी मागण्याची सूचना केली..
पत्रकारांच्या एकजुटीचा हा विजय होता..
अभिनंदन टीम नांदेड..
*सातारा*
सध्या सर्वत्रच तोतया पत्रकारांची गर्दी होताना दिसतेय..ही मंडळी पत्रकार नसताना पत्रकार म्हणून मिरवते.. वसुलया करते.. बदनाम खरे पत्रकार होतात.. .. सातारयात एक तोतया पत्रकार आपण दोन वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचे सांगून खंडण्या गोळा करतोय ही बाब जेव्हा स्थानिक पत्रकारांच्या लक्षात आली तेव्हा पत्रकारांनी थेट पोलिसात धाव घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायला पोलिसांना भाग पाडले.. या घटनेनं तोतयांना आळा बसेल अशी अपेक्षा..अन्य जिल्ह्यातही पत्रकारांनी तोतयांना पोलिसांच्या हाती दिले पाहिजे..
*सातारा*
शंभुराज देसाई यांना सातारच्या पत्रकारांनी आज अक्षरशः घाम फोडला.. शासकीय रुग्णालयाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना उत्तरं देताना मंत्रीमहोदयांची त्रेधातिरपीट उडाली .. रूग्णालयातील अस्वच्छता, दुर्गंधी याबाबत पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला तेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटीव्ह विचार करा असे सांगून मंत्र्यांनी वेळ मारून नेली.. यावेळी त्यांची चीडचीड झाकून राहुली नाही..
0 टिप्पण्या