🌟पुर्णा तालुक्यातील पिंपळा भत्या येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य कॅण्डल मार्च संपन्न....!


🌟या कॅण्डल मार्च मध्ये सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला🌟 


पुर्णा (दि.३० ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील पिंपळा भत्या येथे क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थांच्या वतीने काल रविवार दि.२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास भव्य कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.


या कॅण्डल मार्च मध्ये गावातील अबालवृद्ध माता-भगिनींसह तरुण मंडळींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला यावेळी कॅण्डल मार्च मध्ये सहभागी तरुण-तरुनींनी एक मराठा लाख मराठा.... आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे... मनोज जरांगे पाटील आगे बढों हम तुम्हारे साथ हैं....जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता या कॅण्डल मार्च मध्ये सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदवला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या