🌟मंगरूळपीर येथे मोबाईलवर धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस ठेवल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल....!


🌟या घटनेतील आरोपीला पोलीसांनी केले तात्काळ अटक🌟

फुलचंद भगत

वाशिम :- दिनांक 16/10/2023 रोजी मंगरूळपिर येथील रहवासी यांनी मोबाईल मधील इस्टाग्राम या मोबाईल अॅप मधुन धार्मीक भावना दुखविणारे व्हिडीओ डाउनलोड करून सदर

चा व्हिडीओ मोबाईल व्हाटसअप अॅप स्टेटसच्या माध्यामातुन जनतेत प्रसार केले धार्मिक भावना दुखवल्या असता सदर इसमा विरूध्द मंगरूळपिर पोलीस स्टेशन येथे अप क 726 / 23 कलम 295 अ, 153 अ, भादविस अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी नामे आवेस अन्नु हिरेवाले वय19 वर्षे राहणार गवळीपुरा तालुका मंगरूळपिर जिल्हा वाशिम यास गुन्हयात तात्काळ अटक केले आहे.तरी सर्व जनतेस वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आव्हान करण्यात आले की,सोशल मीडियाद्रवारे व्हॉटसअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, टिव्टर, या वर जातीय तेढ निर्माण होईल अश्या पोस्ट करू नये हे कायदयाने गुन्हा आहे. जर असे आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल......


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या