🌟वाघाळा जिल्हा परिषद शााळेतील चिमुकल्यांची उव्दिग्न प्रतिक्रीया ; शाळा सोडून विद्यार्थी उपोषण स्थळी🌟
परभणी/पाथरी:-गुरूजी आम्हाला जर आरक्षण मिळणारच नसेल तर आम्ही शाळा शिकुन तरी काय करणार आमचे मायबाप राणात राबराब राबतात आमच्या सह जगाला खायला घालतात.आम्ही मुलांनी खुप शिकावं मोठ्ठ व्हावं ही त्यांची इच्छा पण किती ही मार्क घेतले तरी आम्ही घरीच राहातो,त्या पेक्षा शिक्षण न घेता त्यांच्या सोबत काम केलेलं बरं आम्ही शाळेतून चाललो आम्ही नाय येणार आता हीउव्दिग्न प्रतिक्रीया आहे वाघाळा जि प माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका चिमुल्या विद्यार्थीनीची. लेकरांनाही त्यांचं भवितव्य समजु लागलेय अगदी डोळे आसवांनी दाटून आले म्हणत शासनाने गरीब मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे अशी प्रतिक्रीया एका शिक्षक मोहदयांनी दिली.
मनोज पाटील जरांगे यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून वाघाळा गावात लिंबा गटातील दहा-बारा गावचे मराठा समाज बांधव २५ ऑक्टोबर पासुन साखळी उपोषण करत आहेत. वाघाळा येथे उपोषण सुरू असल्याने या ठिकाणी मराठा आरक्षण समर्थनार्थ होत असलेल्या घोषणाबाजीने विद्यार्थी प्रेरीत होत आहेत. घरी गेलं की विषय एकच आरक्षणाचा त्या मुळे शुक्रवारी येथिल जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आपसात कुजबुज करत आपण ही शाळेवर बहिष्कार टाकु शिकून तरी काय उपयोग म्हणत अचानक वर्गाबाहेर आल्याने शिक्षकांना काही कळलेच नाही. या वर बाहेर कुठे जाता असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित करताच चिमकल्या विद्यार्थिनीने मन हेलाऊन टाकणारे वरील उदगार काढताच शिक्षक ही आवाक झाले. या विद्यार्थ्यांनी चक्क छत्रपती शिवरायांचे स्मारक गाठून या ठिकाणी बसलेल्या मराठा आंदोलकांत जाऊन मराठा आरक्षण समर्थनार्थ घोषणाबाजी करत आज पासुन शाळेत न जाण्याचा निर्धार केला.या मुळे उपोषण कर्ते पालक ही सुन्न झाल्यचे पहावयास मिळाले.....
0 टिप्पण्या