🌟राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव आज शुक्रवार दि.२० ऑक्टोंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर....!


🌟सकाळी 11-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहे🌟 

परभणी : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015  या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी व सेवा महिना कालावधीत केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव हे छत्रपती संभाजी नगर येथून आज शुक्रवार दि.20 ऑक्टोंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्याअनुषंगाने आयुक्त डॉ. किरण जाधव हे जिल्ह्यातील नियंत्रण अधिकाऱ्यांच्या समवेत लोकसेवा पुरविणारे सर्व खाते, विभाग प्रमुख यांची सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत.....

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या