🌟प्रशासकीय नौकरशहांनों अन् पुढाऱ्यांनो भलेही तुमच्या जाहिरातींची भिक नको पण्.....


🌟प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींवर बेताल भुंकून तोंडसुख घेणारी बावचळलेली समर्थक मोकाट कुत्री तेवढी आवरा🌟 

✍🏻परखड सत्य - चौधरी दिनेश (रणजित)

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकार क्षेत्रातील विविध प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अपप्रचार व अप शब्दांचा वापर वेळोवेळी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा गंभीर प्रकार सातत्याने होत असून या प्रकारा मागे भ्रष्ट नौकरशहा आणि तत्त्व भ्रष्ट लोकप्रतिनिधींसह अवैध व्यवसायांना उपजीविकेसह अमाप संपत्ती कमावण्याचे साधन बनवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी समाज विघातक प्रवृत्ती अन् आपल्याला कुठेच न्याय मिळाला नाही तर शेवटचा पर्याय म्हणून चला आता पत्रकाराकडे जाऊ असे म्हणून त्या पत्रकारांच्या दरवाजाची कडी वाजवणारे अहसान फरामोश देखील कालांतराने त्या पत्रकाराच्या विरोधात रचल्या जाणाऱ्या कुटिल षडयंत्रात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या निचवृत्तीचा परिचय देतांना आढळून येतात.

सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना असे दिसून येते की मुलभूत नागरी समस्या असो की वैयक्तिक समस्या प्रत्येक वेळीं पत्रकारांकडून न्यायाची अपेक्षा करणारे अल्पबुधदीजिवी पत्रकारांवर एखादं संकट कोसळल की मात्र त्या पत्रकाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याऐवजी त्याच्यात विरोधात भुंकायला सुरुवात करतात अन् मग काय आश्चर्य या क्षेत्राला पोटभरण्याचे साधन बनवलेले अन् काही भ्रष्ट प्रशासकीय नौकरशहा आणि तत्वभ्रष्ट पुढाऱ्यांच्या खरगट्या ताटाखालील मांजरीं प्रमाणे शेपूट हलवत जिवन जगत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कलंकित करणारे 'कलम करंटे' देखील पत्रकार विरोधी कळपातील मोकाट कुत्र्यांना दिशा निर्देश देण्यास सुरुवात करतात 'अहों शेवटी लच्चर संधीसाधूंची एकजात जमात संधीच सोनं करण्या एकाच व्यासपीठावर येणारच ना ?' जनहीवादी पत्रकारितेला बगल देऊन संधीसाधू पित्त पत्रकारीरतेला प्राधान्य देणारी 'झेलाराम कलमी किड' गाव परिसरासह संपूर्ण तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा वेळोवेळी घात करणाऱ्या समाजात द्वेषभावना निर्माण करणाऱ्या समाजघातकी प्रवृत्तींवर वेळोवेळी प्रखरपणे लिखाण करून प्रशासकीय न्याय व्यवस्थेला सत्य परिस्थितीशी अवगत करण्याऐवजी जर समाजघातकी प्रवृत्तींचे दलाल बनून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आसपास गोंडा घोळत त्यांची दिशाभूल करीत असतील तर समजून घ्या लोकशाहीची वाटचाल हळुवारपणे ठोकशाहीच्या दिशेने होत आहे.

* प्रसिध्दी माध्यमांचे महत्त्व कळले कुणा ? 

सामाजिक/शैक्षणिक क्षेत्रात/राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट बेईमान संधीसाधूंची संख्या वाढू लागल्याने या संधीसाधूंनी प्रशासकीय क्षेत्रातील भ्रष्ट बेईमान नौकरशहांशी सरळसरळ टक्केवारींचे अलिखीत करार केल्यामुळे संबंधित क्षेत्रातील भ्रष्ट लोक प्रसारमाध्यमांतील जनहित वादी वृत्तपत्र प्रतिनिधींशी सुरक्षित अंतर निर्माण करीत काही जनहीतघातकी कलम करंट्यांना आपल्या भ्रष्ट कारभाराने बरबटलेल्या हातातील बाहुल्या बनवत प्रसार माध्यमातील जनहीवादी पत्रकारांच्या गळ्याभोवती बदणामीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे सोशल नेटवर्किंग साईट अर्थात फेसबुक/इन्स्टाग्राम/ट्युटर/शेरचॅट आदींवर आपल्या समर्थकरुपी पाळीव प्राण्यांकडून जनहीवादी पत्रकारांवर चिखलफेक करण्याचे त्यांच्यावर जिवघेणे हल्ले करण्याचे भ्रष्ट नौकरशहांशी आर्थिक हितसंबंध जोपासत लोकहितवादी पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर देखील गंभीर खोटे गुन्हें दाखल करुन मानसिक खच्चीकरण करण्याचे गंभीर प्रकार सातत्याने सर्वत्र होतांना निदर्शनास येत असल्यामुळे जनसामान्यांच्या हितस्वातंत्र्यासह लोकशाहीचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे.

प्रसार माध्यमांमध्ये कुठल्याही प्रकारची जनहीवादी बातमी प्रकाशित करतांना संबंधित प्रतिनिधीने ती बातमी अगदी निस्वार्थपणे प्रकाशित करावी कारण त्याचे ते कर्तव्यच असते परंतु जनमतातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना,औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकाला,राजकीय पक्ष पदाधिकारी, व्यावसायिकाला त्यांच्या प्रतिष्ठानाची जाहीरात वर्षातून एकदा देण्याची विनंती करणे हा निश्चितच त्या पत्रकाराचा हक्क असतो त्याचा तो कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसतो कारण प्रत्येक वृत्तपत्र प्रतिनिधींना संबंधित वृत्तपत्र व्यवस्थापनाकडून प्रत्येक दिपावली/वर्धापनदिनाच्या जाहिरातींचे टारगेट दिलेले असते परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे अनेक लोकप्रतिनिधी/उद्योजक/शैक्षणिक संस्था चालक/प्रशासकीय अधिकारी पत्रकारांना जाहिरात तर देतात परंतु जाहीरातींची बिल देतांना मात्र त्याच्यावर स्वतःच्या चपला झिजवून घेण्याची वेळ आणतात काही महाभाग तर पत्रकारांचे फोन देखील उचलत नाहीत परभणी जिल्ह्यात विशेष करून पुर्णा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात तर असेही झटाळ आहेत ज्यांनी अनेक पत्रकरांची जाहीरात बिल बुडवण्यात धन्यता मानली आहे यास सर्वस्वी राजकीय लोकप्रतिनिधीच जवाबदार आहेत असे म्हणने निश्चितच चुकीचे ठरेल यास काही विद्यमान लोकप्रतिनिधी उद्योजकांचे समर्थक अन् कारभारी देखील जवाबदार असून संबंधितांनी जाहिरात बिलांचे पैसे दिल्यानंतर देखील ते मागील दोन दोन वर्षांपासून पत्रकारांना मिळालेले नसल्याने 'कावळा केला कारभारी अन् विष्ठा आली दरबारी' अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे जनहीताशी प्रामाणिकपणे बांधिलकी जोपासत निर्भिड पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांना आता " प्रशासकीय नौकरशहांनों अन् पुढाऱ्यांनो भलेही तुमच्या जाहिरातींची भिक नको पण्.....प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींवर बेताल भुंकून तोंडसुख घेणारी बावचळलेली समर्थक मोकाट कुत्री तेवढी आवरा होतं असे म्हणण्याची वेळ आली आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या