🌟दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना अटक....!


🌟उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे विश्लेषणात्मक बातमी प्रकाशित केल्याप्रकरणी करण्यात आली अटक🌟

  🌟या अटकेबाबत पत्रकारीता क्षेत्रातून निषेध व्यक्त केला जात असून चौथ्या स्तंभावर हल्ला असल्याचे बोलले जात आहे🌟

दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना अटक करण्यात आली असून त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची विश्लेषणात्मक बातमी प्रकाशित केल्याप्रकरणी करण्यात आली अटक.

यासंदर्भात माहिती अशी की, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दैनिक लोकपत्रच्या अंकात 'मराठा आंदोलनाच्या नावाखाली कोणाचीही दांडगाई खपवून घेतली जाणार नाही-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा' अशा आशयाची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमी संदर्भात भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र शेषराव साबळे पाटील यांच्या तक्रारीवरून आज एमआयडीसी सिडको पोलीसांनी अटक केली आहे. दिनांक १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 'गरजवंत मराठ्यांचा लढा' आयोजित केला होता. या सभेसाठी लाखो बांधव एकत्रीत आले होते.

या आंदोलनादरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी टोकाची तिखट प्रतिक्रिया दिली होती. यामुळे त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून टार्गेट करत शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात आहेत. याबद्दल प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्याही सुरक्षेची हमी सरकार घेत आहे आणि धमक्या आणि शिवीगाळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली. सदर बातमीची विश्लेषणात्मक मांडणी दैनिक लोकपत्रने १६ ऑक्टोबर च्या अंकात प्रकाशित केली होती.  या अटकेबाबत पत्रकारीता क्षेत्रातून निषेध व्यक्त केला जात असून चौथ्या स्तंभावर हल्ला असल्याचे बोलले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या