🌟मुंबई गुन्हे शाखेची धाडसी कारवाई : कारवाईतील आरोपी अल्प शिक्षित🌟
मुंबई : देशातील पंजाब गुजरात राज्यांप्रमाणेच आता ड्रग माफियांनी महाराष्ट्र राज्यात देखील जाळे फैलावण्यास सुरुवात केली असून राज्यातील सोलापूर येथील औद्योगिक वसाहतीत ड्रग माफियांनी चक्क दिडशे कोटींच्या गुंतवणूकीतून बेकायदेशीररित्या ड्रग निर्मितीचा कारखनाच उभारल्याचा गंभीर प्रकार मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईतून उघडकीस आला आहे महाराष्ट्रात ड्रग्स तस्करीचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने सुरुवात केली असून अगोदर पुणे नंतर नाशिक अन् आता सोलापूरमध्ये मुंबई गुन्हें शाखेने धाडसी कारवाई करीत चक्क ड्रग कारखनाच उभारल्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे.
मुंबई गुन्हे शाखेने सोलापूरच्या चिंचोली औद्योगिक वसाहतीत एमडीची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचाच परदाफाश केला आहे. यावेळी १६ कोटी रुपयांचे एमडी तसेच १०० कोटी रुपयांचा कच्चा माल मुंबई गुन्हें शाखेने ताब्यात घेतला आहे
गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी एमडीची विक्री करण्यात आलेल्या राहुल गवळी आणि अतुल गवळी या दोघांना तीन किलो एमडीसह अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये या ड्रग निर्मिती कारखान्याचा उलगडा होताच गुन्हे शाखेने चिंचोली एमआयडीसी येथे धाड टाकून ड्रग कारखाना उध्वस्त केला आहे.
या कारवाईत तब्बल पाच किलो एमडी जप्त करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे की हे दोघेही दहावी नापास असून पूर्वी एका केमिकल कारखान्यात काम करत होते आणि तिथेच त्यांनी एमडी कसं करायचं त्याचा प्रशिक्षण घेतलं. त्यानुसार चिंचोली एमआयडीसी येथे ३० हजार रुपये प्रति महिना भाड्याने २१ हजार चौरस फुटी जागा भाड्याने घेऊन तिथे एमडी बनवण्याचा कारखाना थाटला.याआधी देखील त्यांनी कारखाना परिवाराची निर्मिती करून मुंबईच्या पश्चिम उपनगरात एमडी विकल्याचा तपासात समोर आलं आहे. आता याप्रकरणात आणखीन कोण सहभागी आहेत, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.....
0 टिप्पण्या