🌟वैष्णोदेवीहुन आणली आदिशक्तीची ज्योत : १८०० किमीचा पायी प्रवास ३८ युवक सहभागी.....!


🌟मेहकर येथील महाजन यांनी एक दिवस पूर्ण व्यवस्था करण्यात आली : जागो जागी स्वागतासाठी भक्तगण उपस्थित होते🌟

मानवत (प्रतिनिधी) :-  मानवत शहरातील चंदनेश्वर गल्लीत दरवर्षी साजरा होणाऱ्या आदिशक्ती सार्वजनिक नवरात्र महोत्सवात ह्यावर्षी जम्मू काश्मीर च्या कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरातून तब्बल १८०० किलोमीटर अंतरचा प्रवास करीत आदिशक्ती ज्योत आणली जात आहे . सोमवारी ता २५ ही पायी ज्योत यात्रा निघाली असून ऊन , पाऊस व थंडीची पर्वा न करता अनवाणी पायाने २१ दिवसांचा प्रवास करून सुखरूप नवरात्रीच्या पहिल्या माळेला १५ ऑक्टोबरला मानवत शहरात ही यात्रा आली  आहे .मानवत रोड येथे दरवर्षी प्रमाणे मगर सावंगी येथील मगर परिवारांनी त्याचे जंगी स्वागत केले आणी ज्योत ची पूज्या करून त्यांना फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली यावे गावकरी देवकरीण मीराबाई मगर  ,लक्ष्मण मगर ,साहेबराव मगर,संतोष मगर , नितीन मगर मुंजा मगर ,योगेश नखाते ,भागवत मगर सुमन नखाते ई 


     श्रद्धा व भक्तीपोटी मानवत शहरातील आदिशक्ती या सार्वजनिक नवरात्र महोत्सवात गेल्या ९ वर्षापासून देवीच्या शक्तीपीठाहून आदीशक्ती ज्योत पायी यात्रेने आणली जात आहे . ही ज्योत शहरातील चंदनेश्वर गल्लीतील आदिशक्ती नवरात्र महोत्सवात १० दिवस तेवत ठेवली जाते . ह्या वर्षी बुधवारी ता २० ला शहरातील ३८ युवक ज्योत आणण्यासाठी माता वैष्णोदेवी येथे गेले असून ते शनिवारी ता २३ पोहचले . सोमवारी ता २५ आदिशक्ती ज्योत घेऊन ते निघाले असून एकूण १८०० किमीचा २१ दिवसांचा पायी प्रवास करून ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी १५ ऑक्टोबरला ते मानवत शहरात आली आहे  . 


♦️पायी यात्रेचे ९ वे वर्ष

   येथील आदिशक्ती नवरात्र महोत्सवात आत्तापर्यंत दरवर्षी देवीच्या वेगवेगळ्या शक्तीपीठावरून पायी ज्योत  आणण्यात आली आहे . यापूर्वी तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरातून दोन वेळेस , कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर , नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगीमाता मंदिर , माहुरच्या रेणुकामाता मंदिर , मध्यप्रदेशातील उज्जैन येथील हरिसिद्धीमाता मंदिर , राजस्थान पुष्कर येथील चामुंडा माता मंदिर व उत्तरप्रदेशातील काशी येथील विशालक्षीमाता मंदिरातून ज्योत आणली आहे . 

   ♦️ यात्रेत ३८ भाविक सहभागी 

   मातावैष्णोदेवी येथील मंदिरातून आणल्या जात असणाऱ्या या ज्योत यात्रेत शहरातील रवी सोनवणे , आप्पा भिसे , सूर्यकांत कडतन , स्वप्नील देशमुख, प्रवीण मगर , माऊली यमगिर , पांडुरंग मेहत्रे , अंकलेश्वर कीर्तनकार , अर्जुन निर्मळ , शंतनू गणाचार्य , बालाजी बरडे , श्याम कचव्हे , पप्पू नीळकंठ , भारत कोसापुरे , रंगनाथ कोंडगिर , उमेश घाडगे , राम शिंदे , गणेश गडदे , गणेश कठाडे , माधव दहे , समर्थ घोडके , उमेश दहे , सुरेंद्र करपे , गजानन अग्रवाल , पिंटू फल्ले , राजू धुमाळ , बालाजी पारवे , गंगाधर शिंदे , कैलास कडतन , बळीराम वाघमारे, दत्ता बरडे , अतुल कदम , श्रीकांत सोरेकर , अजय दहे , जितेंद्र लोलगे , संतोष जाधव , पप्पू धुमाळ व गजानन वाघमारे या भाविकांचा समावेश आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या