🌟श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठानच्या बीड जिल्हा संपर्क प्रमुखपदी तुळशीराम पवार.....!


🌟प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, उपाध्यक्ष रितेश दादा पवार, शेखर पवार यांनी ही नियुक्ती केली🌟

बीड /परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

      सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठानच्या बीड जिल्हा संपर्क प्रमुखपदी परळी वैजनाथ तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, उपाध्यक्ष रितेश दादा पवार, शेखर पवार यांनी ही नियुक्ती केली. या निवडीबद्दल पवार यांचे अभिनंदन केले जात आहे. 

         तुळशीराम पवार हे गेली अनेक वर्षं सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांचे अतिशय उल्लेखनीय आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्राचा दांडगा अनुभव व संघटन कौशल्य असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा संकल्प व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक तुळशीराम पवार यांची श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठानच्या बीड जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे. पवार यांचा केवळ बीड जिल्ह्य़ातच नव्हे तर संपुर्ण राज्यात प्रचंड जनसंपर्क असून सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठानच्या महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

        राजकिय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संघटनेची जबाबदारी निष्ठेने पार पाडू आणि प्रतिष्ठानचे कार्य तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे यावेळी तुळशीराम पवार यांनी सांगितले. दरम्यान तुळशीराम पवार यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या