🌟पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या शासकीय वाहनाची तहसील कार्यालय परिसरात अज्ञातांकडून तोडफोड....!🌟पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांची पोलीस पथकासह घटनास्थळी धाव🌟


पुर्णा (दि.३० ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यात सर्वत्र शांततेत व लोकशाही मार्गाने मराठा आरक्षण आंदोलन सुरू असतांना आज सोमवार दि.३० ऑक्टोंबर २०२२ रोजी दुपारी ०३-०० ते ०३-३० वाजेच्या पुर्णा तहसील कार्यालय परिसरात लावलेली तहसीलदार माधवराव बोथीकर यांचे शासकीय वाहन चारचाकी गाडीच्या काचांची अज्ञातांनी तोडफोड केल्याची दुर्दैवी घटना घडली.


पुर्णेचे तहसीलदार बोथीकर यांच्या गाडीचा क्र.एम.एच २२ एएम १२९८ असा असून सदरील शासकीय वाहनाच्या काचांची तोडफोड करतेवेळी घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे समजते सदरील घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी तात्काळ रवाना झाले व त्यांनी घटनास्थळ पाहनी व पंचणामा केल्याचे समजते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या