🌟अन्याय करणारे लोकप्रतिनिधी पासून मतदाराने दक्षता पाळावी 🌟
✍🏻लेखक :'परखड सत्य'
सुभाष राठोड (सेवानिवृत्त पोलिस अधिकारी)
जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज किंवा प्रथम खबरी येते तेव्हा पोलीस चौकशी किंवा तपास करून अर्जदारास किंवा खबर देणाऱ्यास पत्र पाठवून माहिती देतात तेव्हा पोलीस प्राथमिक न्याय देतात परंतु आपण जेव्हा मंत्रालयात आपल्या अन्यायाविरुद्ध तक्रार अर्ज देतो त्याचे निकालीचे उत्तर किती अर्जदाराला येतात उत्तर न देणेहा अन्याय नाही काय? अपघातातील जखमीस तात्काळ उपचार साठी दवाखान्यात घेऊन जाणे साठी आपण मदत करतो तेव्हा आपण जखमीस न्याय देतो त्याच अपघातातील जखमीस पाहून आपल्याला काय करायचे असे म्हणून निघून जातो तेव्हा आपण जखमी वर अन्याय करतो
अनैतिक संबंधातून नुकतेच जन्मलेले मुल कचराकुंडीत दिसतात तेव्हा आपण तात्काळ त्या बालकास दूध पाजून प्राथमिक उपचार करतो पोलिसांना माहिती देतो तेव्हा त्या बालकास न्याय देतो बघून निघून जातो म्हणजे त्या बालकावर अन्याय करतो घरास जंगलास लागलेली आग विजण्यासाठी आपण मदत करतो म्हणजे घरमालकास समाजास न्याय देतो घरास जंगलात जेव्हा कोणी आग लावतात म्हणजे तो अन्याय करतो
सर्वसामान्य जनता जेव्हा पिण्याचे पाणी मिळण्यासाठी शेती सिंचन साठी पाणी मिळण्यासाठी सुरक्षित वाहतुकीसाठी रस्ता मागणी आपल्या आमदारासाहेबांना करतात तेव्हा जनतेची मागणी पूर्ण होते तेव्हा त्यांना न्याय मिळतो काम नाही झाले तर अन्याय आहे अन्याय करणारे लोकप्रतिनिधी पासून मतदाराने दक्षता पाळावी ही विनंती कारण सध्या सरकार सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय चालवीत आहे अन्यायग्रस्त लोकांना न्याय देत आहे परंतु सरकार अमलबजावणी करण्यास तयार नाही
✍🏻लेखक :
सुभाष राठोड (सेवानिवृत्त पोलिस अधिकारी)
महाराष्ट्र संघटक
राष्ट्रीय बंजारा परिषद मुंबई
0 टिप्पण्या