🌟मराठवाडाही ड्रगच्या विषारी विळख्यात ? नाशिक छत्रपती संभाजी नगरनंतर आता सोलापूरात देखील ड्रग....!

 
🌟सोलापुरात ड्रग्सच्या कारखान्यावर धाड टाकून पोलिसांनी कोट्यवधीचा साठा केला जप्त🌟


छत्रपती संभाजी नगर : महाराष्ट्र राज्यात ड्रग माफियांनी सर्वत्र ड्रगचे जाळे पसरवले असल्याचे पोलीस तपासात हळुवारपणे उघडकीस येत असून नाशिक नंतर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी नगर मध्ये देखील ड्रग माफियांनी आपले पाय फैलावल्याचे उघडकीस आल्यानंतर आता पोलिसांनी सोलापूर मधील औद्योगिक वसाहतीत ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.


पंजाब गुजरात हरियाणा या राज्यांनंतर आता महाराष्ट्रात देखील ड्रग माफियांनी विषारी जाळे पसरवण्यात सुरुवात केल्याने 'उडता पंजाब' नंतर आता 'उडता महाराष्ट्र' म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यातील नाशिक,छत्रपती संभाजी नगर नंतर आता सोलापूर मधील औद्योगिक वसाहतीत बेकायदेशीररित्या सुरू असलेला 'एमडी ड्रग्सचा' कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पथकानं सोलापुरात जाऊन ही मोठी कारवाई केली आहे या कारवाई मुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती या घटनांना काही दिवस उलटत नाही तोचता आता सोलापुरात देखील 'एमडी ड्रग्सचा' बेकायदेशीर कारखाना आढळून आला आहे.


सोलापूरमध्ये 'एमडी ड्रग्सचा' बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोलापूरच्या मोहोळ औद्योगिक वसाहती मधील 'एमडी ड्रग्स' कारखान्यावर धाड टाकली. पोलिसांनी टाकलेल्या या धाडीमध्ये  कोट्यावधी रुपयांचे 'एमडी ड्रग्ससह ड्रग्स निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल देखील जप्त करण्यात आला आहे नाशिक पोलिसांच्या तीन पथकांनी सोलापुरात जाऊन ही कारवाई केली आहे. एमडी ड्रग्स तयार निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल देखील जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान यापूर्वी राज्यातील नाशिक आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये देखील पोलिस प्रशासनाने धडी टाकल्या असून या दोन्ही शहरातून मोठ्याप्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांच्या तीन पथकानं मोहोळ औद्योगिक वसाहती मधील कारखान्यावर धाड टाकली या धाडीत कोट्यवधीचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या