🌟पुर्णा तालुक्यातील पिंपळा भत्या गावात ग्रामस्थांचा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार....!
🌟मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी : गावाच्या वेशीवर लावला प्रवेश बंदीचा फलक🌟पुर्णा तालुक्यात पूर्णा तालुक्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू झाली असून प्रत्येक गावामध्ये आता राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी घालण्यात आल्याचे बोर्ड झटकू लागले आहे जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत तोपर्यंत गावामध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी लावण्यात आल्याचे बोर्ड आता हळुवारपणे सर्वत्र झळकू लागले आहेत तालुक्यातील पिंपळा भत्या गावात देखील गावच्या वेशीवर चुलीत गेले नेते चुलत गेले पक्ष मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष अशा प्रकारचा फलक लावण्यात आला असून या फलकावर मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही आगामी काळात येणाऱ्या होणाऱ्या सर्व निवडणुकांवर  बहिष्कार राहील स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला असून पक्ष पुढाऱ्यांनी आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा अशी चेतावणी देखील देण्यात आली असून ही चेतावणी सकल मराठा समाज व समस्त गावकरी मंडळींकडून देण्यात आली आहे.


पिंपळा भत्या येथील सकल मराठा समाज व गावकरी मंडळींनी मराठा आरक्षणासाठी जाणीवपूर्वक होत असलेल्या वेळकाढूपणाचा तीव्र निषेध केला असून संतप्त ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्रित येवुन पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन मराठा आरक्षणाला होत असलेल्या विलंबाचा तिव्र निषेध नोंदवत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत पिंपळा भत्या गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आल्याचे देखील नमूद केले असून या निवेदनावर सकल मराठा समाज बांधवांसह समस्त गावकऱ्यांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या