🌟पुर्णेतील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका समोर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात...!


🌟मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा व मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण🌟

पुर्णा (दि.३० ऑक्टोंबर) - पुर्णा येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका समोर सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतिकारी मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षणा संदर्भात सरकार वेळकाढू धोरणाचा अवलंब करीत असल्याच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मागील दि.२५ ऑक्टोंबर २०२३ पासून साखळी उपोषन सुरू असून आज पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील सरकार मराठा आरक्षण लागू करण्या संदर्भात टाळाटाळ करीत असल्याने दिवसेंदिवस मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याने सरकारी बेबंदशाही विरोधात आज सोमवार दि.३० ऑक्टोंबर २०२३ पासून पुर्णेतील शिवतीर्थावर देखील साहेबराव कल्याणकर (दाजी), मुंजाभाऊ कदम, ज्ञाणोबा कदम,कामेश अंभोरे यांनी मराठा आरक्षण व क्रांतिकारी मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आमरण उपोषणास सुरुवात करून सकल मराठा समाज बांधवांच्या न्यायिक मागण्यांकडे सरकारचे तात्काळ लक्ष द्यावे या दृष्टीने आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या