🌟पुर्णा-फुकटगावास वंचित बहुजन युवक आघाडी देणार न्याय......!


🌟फुकटगाव येथील स्मशानभूमी साठी ०२ गुंठे जमीन नावे करण्यास मंजूरी🌟 


🌟बौद्ध विहारासाठी देखील ०२ दिवसात  ठराव घेऊन जमीन नावे करून देण्याचे असे अस्वासन🌟

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील मौ.फुकटगावास दि.१३ ऑक्टोबर २०२३ रोजी फुकटगाव या गावास वंचित बहुजन युवक आघाडी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दि.१५ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट देऊन गावातील समस्या जाणून घेतल्या व गावातील मागासवर्गीय सभागृहाची अवस्था पाहिली सदरील अवस्था पाहून गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना गावकरी यांच्या समवेत पुर्णा येथे भेट घेऊन समस्या सांगण्यात आल्या व त्या समस्या सोडवन्यात आल्या. फुकटगाव येथील स्मशानभूमी साठी ०२ गुंठे जमीन नावे करण्याचे मंजूर करुन बौद्ध विहारासाठी देखील ०२ दिवसात  ठराव घेऊन जमीन नावे करून देऊ असे अस्वासन गटविकास अधिकारी व फुकटगाव येथील ग्रामसेवक यांनी दिले. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड वंचित बहुजन युवक आघाडी परभणी,ऍड.सिद्धांत गायकवाड यांच्यासह गावकरी मंडळी  उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या