🌟येथील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या🌟
पुर्णा (दि.३० ऑक्टोंबर) - महिलांनी जीवनातील अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली जीवनशैली स्विकारली तरच महिलांचे आरोग्य सुदृढ राहील असे प्रतिपादन डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले. त्या येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाला की महिला आणि पुरुष समतेसाठी ज्या ज्या महामानवांनी कार्य केले त्यांच्या विचाराने महिलांनी स्वयंप्रकाशित होऊन समाज जीवन प्रगल्भ केले पाहिजे. तसेच महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करुन सामाजिक व सांस्कृतिक छंद जोपासून सेवाभावी वृत्तीने मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर निश्चितच महिलांना आपले संपूर्ण जीवन सुखी व दीर्घायुष्य जगता येईल असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
या कार्यक्रमाचे उदघाटक इंजिनिअर अविनाश कोठाळे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की आजच्या महिलांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचा विचार करून आपले भविष्य घडविले पाहिजे. आपले आरोग्य आणि व्यक्तिमत्व घडविण्यासाठी बुद्धाच्या अत् दीप् भव् या स्वंयप्रकाशित विचाराने आपल्यात बळ निर्माण करून आपला विकास केला पाहिजे. पारंपरिक रस्ते बदलून सुदृढ आरोग्य व उद्योग विषयीचा मार्ग शोधण्यासाठी महिला पुढे आल्या पाहिजेत तरच समाज पुढे जाईल व राष्ट्र बलवान घडेल असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या बीजभाषक भोपाळ येथील प्रा. डॉ. मिनू पांडे यांनी महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी तिचे मानसिक आरोग्य जपणे हे कुटुंबातील व समाजातील सर्वांचे कर्तव्य असून समाजातील सर्व स्तरातील घटकांनी स्त्रियांच्या आरोग्यासाठी सकारात्मकता ठेवून काळजी घेतली तर महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात निश्चितच पुढे येऊ शकतात असे त्यांनी आपल्या बीज भाषणात सांगितले. यावेळी साधन व्यक्ती डॉ. वनिता काळे यांनी स्री शक्तीचा विकास व्हावा असे वाटत असेल तर समाजात व कुटुंबात त्यांच्या विचाराला व प्रज्ञेला स्वतंत्रपणे मान्यता दिली पाहिजे. तिचा सन्मान झाला पाहिजे. स्त्री वर्गातील निरक्षरता हा तिच्या परिवर्तनाच्या मार्गातील अडथळा बाजूला सारला गेला तरच तिच्या विकासाला गती मिळेल आणि आरोग्य सुदृढ राहील असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी विचारमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा निमंत्रक डॉ. रामेश्वर पवार,सिनेट सदस्य डॉ. वैजंता पाटील, प्राचार्य कुसुमताई मोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा गायकवाड, डॉ. वनिता भालेराव, डॉ. शैलजा वाडेकर, सिनेट सदस्य डॉ. शालिनी कदम, डॉ. वर्षा दोडिया,डॉ. विजय साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. सुनीता काळे (पवार) यांनी महिलांच्या आरोग्य संदर्भाने अनेक उपाय व आहार यावर मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण स्त्रीयांकडे आजही आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होते त्याकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी समाजातील जागरूकता वाढविणे व उपाय शोधणे गरजेचे असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या . गृहउद्योग, वस्त्रउद्योग यामध्ये महिलांनी सहभाग नोंदवून आपली आर्थिक क्षमता वाढून प्रबळ झाल्या तरच महिलांचे शोषण थांबून त्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बलवान ठरतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा भोसले यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा. वैशाली लोणे यांनी मानले या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी विविध महाविद्यालयातून प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक डॉ.शारदा बंडे, डॉ.भारत चापके,डॉ. सुरेखा गायकवाड, डॉ. दीपमाला पाटोदे प्रा. वैशाली लोणे, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या