🌟परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या भोगावातील नदीपात्रात सापडलेल्या २५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचे गढ अखेर उकलले...!


🌟ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सय्यद मुदस्सीर या तरुणाची निर्घृण हत्या करुण मृतदेह फेकला नदीत🌟 

🌟घटनेतील तीन आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात🌟 

परभणी (दि.११ ऑक्टोंबर) : पर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद गावातील २५ वर्षीय तरुण सय्यद मुदस्सीर सय्यद इब्राहिम हा तरुण गावातून दि.०४ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना घडली होती या संदर्भात सय्यद मुदस्सीरच्या कुटुंबाने दि.०६ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ताडकळस पोलिस स्थानकात हरवले संदर्भात (मिसिंग) तक्रार नोंदवली होती त्याच दिवशी पालम तालुक्यातील भोगाव येथील नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला होता सदरील मृतदेह सय्यद मुदस्सीरचाच असल्याचे कुटुंबाने ओळख पटल्यावर कुटुंबाने आपल्या मुलावर अवैध रेती तस्करांनी अवैध रेती तस्करी संदर्भातील माहिती प्रशासनाला पुरवीत असल्याचा संशय घेऊन त्याची हत्या केल्याचा आरोप करीत उखळद गावचे सरपंचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती या घटने संदर्भात पोलीस तपासात नदीपात्रात सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले असून तो प्रकार खूनाचाच असल्याचे स्पष्ट करीत त्यातील तीघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

          भोगाव शिवारात नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्याबरोबर पालम पोलिसांनी धाव घेवून तो मृतदेह ताब्यात घेतला अन् या प्रकरणात पालम पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरु केला. पोलिसांना त्यातून पुढील तपासात सय्यद मुदस्सीर या व्यक्तीचा मृत्यू हा घातपातातून घडला असावा असा संशय आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. सर्वप्रथम त्या मृतदेहाची ओळख पटविली असता तो मृतदेह सय्यद मुदस्सीर सय्यद इब्राहिम वय २५ राहणार उखळद या युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले ताडकळस पोलिस स्थानकात दि.०४ ऑक्टोंबर रोजीच उखळदच्या त्या युवकाची बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग व पालम पोलिस यांनी गोपनिय माहिती व तांत्रिक तपासातून पुढील दिशेने तपास सुरु केला तेव्हा उखळद येथील राजेश सुभाष बागल,गणेश सतीश भुसारे व सुनील पिराजी दासलवाड या तीघांनी भांडणाच्या रागातूनच त्या व्यक्तीचा खून केल्याची बाब पुढे आली. मयत व्यक्ती ही या तीघांना, इतरांना नेहमी त्रास देत असे, त्याचा राग मनात धरुनच संबंधित युवकास दारु पाजून, त्याचा गळा दाबून बेशुध्द केले व गाडीच्या डिक्कीत टाकून नवागड जवळील सारंगी पुलावरुन तो मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचे पालम पोलीसांनी तपासात स्पष्ट झाल्याचे म्हटले असून तिघाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

          सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, परभणी ग्रामीणचे  उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे व पूर्णा उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, पोलिस उपनिरीक्षक अजीत बिरादार, गोपिनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान पठाण, जगन्नाथ भोसले आशा सावंत, विलास सातपूते, विष्णु चव्हाण, मधुकर ढवळे, शेख रफीयोद्दीन, निलेश परसोडे, केंद्रे इम्रान, पोलिस निरीक्षक गाडेवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक कारवार, पोलिस उपनिरीक्षक जाधव, अंमलदार केंद्रे, चव्हाण, केदार,  सायबर सेलचे शेख शारेक, स्वप्नील पोतदार, राजेश आगाशे, प्रशांत लटपटे, गणेश कोटकर यांच्या पथकाने केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या